बारामती ! फलटण तालुक्यातील एकावरती वडगाव निंबाळकर येथे बाललैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत  गुन्हा दाखल.

Uncategorized

प्रतिनिधी – फिरोज भालदार

फलटण येथील युवकाचे बारामती तालुक्यातील एका युवतीचे नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार लैंगिक अत्याचार केले प्रकरणी फलटण येथील तरुणावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी ही शीक्षण घेत असताना आरोपी गौरव आदेश निंबाळकर यांची ओळख झाली त्यानंतर तो फिर्यादीशी बोलने चालू झाले त्यानंतर सन २०२० मध्ये आरोपी गौरव याने फिर्यादीस वाईट भावनेने शरीसुखाची मागणी केली. फिर्यादीने त्यास नकार दिला असता आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करु लागला व त्रास देवु लागला मी तुझे घरच्यांना तुझेबाबत काहीपण सांगेन तुझी बदनामी करेन असे धमकी देवु लागल्याने फिर्यादीने त्याचेशी फोनवर बोलण्याचे बंद केले. आरोपीने एक दिवशी फिर्यादी पीडिता ही घरी एकटी असताना आरोपीने राहते घरात जाऊन पिडितेस ‘‘तु माझेशी फोनवर बोल नाहीतर मी तुझे घरच्यांना तुझे व माझे लफडे असलेबाबत सांगतो’’ अशी धमकी दिली.

डिसेंबर २०२१ मध्ये फिर्यादी ही अज्ञान व अल्पवयीन असताना आरोपीने तीला भेटलेवर त्याने फिर्यादीस बदनामी करण्याची धमकी देवुन फलटण येथील त्याचे घराचे जवळच असलेल्या जुन्या पडक्या खोलीत घेवुन जावुन फिर्यादीशी तीचे इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीरसंबध केले व त्यानंतरही दोन ते तीन वेळा त्याच पडक्या खोलीमध्ये फिर्यादीस घेवुन जावुन तीचे इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीसंबध केले . त्यानंतर काही दिवसांनी आरोपीने फिर्यादीस फोन करुन बोलावुन घेवुन तीचे उजवे हाताला धरुन त्याचे जवळील काळे रंगाची MT/50 मोटार सायकलवर बसवुन लॉजला नेवुन फिर्यादीचे इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीरसंबध केले त्यावेळी त्याने त्याचे मोबाईलमध्ये फिर्यादीचे नग्न फोटो तसेच फिर्यादी व आरोपी या दोघांचे नग्न फोटो,व्हिडीओ काढुन फिर्यादीस तु जर सदर प्रकार घरी सांगीतला तर मी तुझे फोटो,व्हिडीओ सगळीकडे व्हायरल करील अशी धमकी देवुन फिर्यादीस ब्लकमेल करुन जबरदस्तीने लॉजवर नेवुन फेब्रुवारी २०२४ पर्यंत वेळोवेळी फिर्यादीशी तीचे इच्छेविरुद्ध शरीसंबध केले.

त्यानंतर दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.३० वा.चे सुमारास आरोपीने फिर्यादी राहत असलेले ठिकाणी येवुन ‘‘मी तुला पाच वर्षे वापरल. ‘‘तु माझे सोबत लॉजवर चल नाहीतर मी माझे मोबाईलमध्ये असलेले तुझे फोटो,व्हिडीओ हे सोशल मिडीयावर व्हायरल करेन अशी धमकी देवुन फिर्यादीस हाताने मारहाण करुन तुला सुखाने जगु देणार नाही. असे म्हणुन जिवे मारणेची धमकी दिली आहे . याबाबत फिर्यादी हिच्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.