वाल्हे प्रतिनिधी – सिकंदर नदाफ
पोलीस मित्र सेवाभावी फाउंडेशनच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी वाल्हे ( ता. पुरंदर ) येथील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग रावसाहेब भुजबळ यांची निवड करण्यात आली आहे.
पांडुरंग भुजबळ यांनी अनेक वर्षांपासून अपघात ग्रस्तांना मदत केली असून ग्राम सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी वेळोवेळी पोलीस प्रशासनाला देखील मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊनच पोलीस मित्र सेवाभावी फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र चौधरी यांनी पांडुरंग भुजबळ यांची पुणे जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी निवड केली आहे.
या दरम्यान सोलापूरचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बोराडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे तसेच वाल्हे गावचे सरपंच अतुल गायकवाड यांसह नवमहाराष्ट्र युवक संघटना तसेच महात्मा फुले प्रतिष्ठान यांच्या वतीने पांडुरंग भुजबळ यांच्या निवडीबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यातआले आहे.