प्रतिनिधी
ब्रह्मपुरी – मनोज जरांगे यांच्या ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे ओबीसी चे आरक्षण धोक्यात येऊ नये म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघ व अन्य ओबीसी संघटना व ओबीसी समाजाचे नेते यांच्या माध्यमातून दिनांक 30 ऑगस्ट 2025 पासून नागपूरच्या संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि समस्त ओबीसी संघटना यांच्या माध्यमातून साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाद्वारे मराठ्यांच्या ओबीसी मध्ये होणाऱ्या घुसखोरी ला पायबंध घालावा आणि ओबीसीच्या हक्कांमध्ये त्यांना वाटेकरी होऊ देऊ नये म्हणून साखळी उपोषण सुरू आहे .याप्रसंगी भारतीय जनता पक्ष भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव प्रा प्रकाश बगमारे यांनी भेट दिली आणि ओबीसी संघटनांनी जे आंदोलन सुरू केले आहे त्याला अधिक तीव्र करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन केले. याप्रसंगी साखळी उपोषणात बसलेलेउपोषणकर्ते व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्रा डॉ बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर ,सहसचिव शरद वानखेडे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. जर ओबीसी समाज गाफिल राहिला तर मराठा समाज शासन प्रशासनावर प्रभाव टाकून ओबीसीच्या हक्काचे आरक्षण आणि त्यामध्ये वाटेकरी होण्याची शक्यता असल्यामुळे सर्व ओबीसी बांधवांनी ही घुसखोरी थांबवावी. यासाठी संविधानिक मार्गाने प्रचंड मोठे आंदोलन करावे आणि सरकारला ओबीसीच्या हिताच्या आड येऊ नये असा इशारा द्यावा असे याप्रसंगी विचार व्यक्त करताना आपले मनोगत व्यक्त केले.