वडगाव निंबाळकर प्रतिनिधी –
बारामती तालुक्यातील वाघळवाडी (सावंतवस्ती) येथे वडगाव निंबाळकर पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू तयार करणारा अड्डा उध्वस्त केला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ६४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तिन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार..
पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८.३० वा. सुमारास वाघळवाडी लगत (सावंतवस्ती) येथे आरोपी विजय सुभाष नवले, अनिल रूपसिंग नवले व शैलेश शंकर नवले हे सर्व आपल्या घराशेजारील पडीक जागेत गावठी दारू तयार करत होते. त्या वेळी आरोपी बॅरलमध्ये ठेवलेले कच्चे रसायन तापवून हातभट्टीची दारू तयार करत होते.
पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचताच आरोपींनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला . कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पाच लोखंडी बॅरलमध्ये १००० लिटर कच्चे रसायन, सात रिकामे बॅरल आणि इतर साहित्य असा एकूण ६४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .
या प्रकरणी पोलीस शिपाई नागनाथ परगे यांनी फिर्याद दिली असून मुंबई प्रोव्हीजन कायदा कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. हवालदार नागटिळक हे करत आहेत.