सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये 54, लाख 29 हजाराच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल होणार का.

Uncategorized

संपादक मधुकर बनसोडे.

मागील काही महिन्यांपूर्वी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये जवळपास 54 लाख 29 हजार रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तत्कालीन लेबर ऑफिसर दीपक निंबाळकर व रूपचंद साळुंखे या कर्मचाऱ्यांना कारखाना प्रशासनाने निलंबित केले.
तर काही कर्मचारी जे निर्दोष होते त्यांना पुन्हा कामावरती घेण्यात आले
कारखाना प्रशासनाकडून साखर आयुक्तांच्या पॅनल वरील मेहता आणि शहा चार्टर्ड अकाउंटंट यांनी डिसेंबर 2017 ते जानेवारी 2025 असा आठ वर्ष कालावधीतील टाईम ऑफिसच्या कामकाजाची तपासणी केली यामध्ये कारखान्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निश्चित झाले या संदर्भातील अहवाल कारखाना प्रशासनाकडे देण्यात आला मात्र तरी देखील कारखाना प्रशासनाकडून अद्यापही कोणावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ठेकेदाराला या सर्व प्रकरणातून अलगद बाजूला ठेवल्याचे ऊस उत्पादक सभासदांमधून बोलले जात आहे
तर राज्याच्या एका मोठ्या नेत्याने संबंधित आरोपींवरती गुन्हे दाखल करू नका असे आदेश दिले असल्याच्या चर्चा सध्या ऊस उत्पादक सभासदांमधून होत आहेत.
चोर कोणत्याही जाती धर्माचा असला कितीही श्रीमंत असला तरी शेवटी तो चोरच असतो.त्यामुळे कारखाना प्रशासनाने आर्थिक गैरव्यवहार केलेल्या आरोपींवरती त्वरित गुन्हे दाखल करून.
कारखान्यामार्फत पारदर्शक कारभार केला जातो याचे उदाहरण जनतेसमोर मांडावे. अपहर केलेली रक्कम संस्थेमध्ये जमा जरी केली असेल तरी सदर आरोपींवरती गुन्हे दाखल दाखल करावेत.
भविष्यात सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये असे गैर कारभार घडू नयेत अधिकारी कर्मचारी यांच्यावरती कारखाना प्रशासनाची जरब बसावी याकरता संबंधित गुन्हेगारांवरती कारखाना प्रशासनामार्फत गुन्हे दाखल करावेत कोणालाही पाठीशी घालू नये

 अशी मागणी सोमेश्वर  कारखान्याचे  सभासद करीत आहे.