संपादक मधुकर बनसोडे.
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात तब्बल ₹54 लाख 29 हजार रुपयांचा आर्थिक घोटाळा उघड झाला आहे. चार्टर्ड अकाउंटंटच्या तपासणीत गैरव्यवहार स्पष्ट झाल्यानंतरही आजवर आरोपींवर गुन्हा दाखल न झाल्याने सभासद व ऊस उत्पादकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
आरोपींवर कोणतीच कारवाई नाही ! या प्रकरणात तत्कालीन लेबर ऑफिसर दीपक निंबाळकर व कर्मचारी रूपचंद साळुंखे यांना निलंबित करण्यात आले होते. काही निर्दोष कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेतले गेले. मात्र, 2017 ते 2025 या आठ वर्षांच्या कालावधीत झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराचा तपास अहवाल कारखाना प्रशासनाकडे जमा होऊनही अद्याप FIR दाखल करण्यात आलेली नाही.
कायदेतज्ज्ञांच्या मते गुन्हा दाखल होऊ शकतो या कलमानुसार या प्रकरणात खालील कलमे लागू होतात –
IPC: 408/409 (विश्वासघात व अपहार), 420 (फसवणूक), 467/468 (खोटी कागदपत्रे), 120(B) (कटकारस्थान)
BNS (2023): कलम 316 (विश्वासघात), 318 (फसवणूक), 336/338 (खोटी कागदपत्रे), 61 (कटकारस्थान)
सभासदांत चर्चेला उधाण आले आहे की, राज्यातील एका प्रभावशाली नेत्याने आरोपींवर गुन्हा दाखल करू नका, असे मौखिक आदेश दिले. परिणामी कारखाना प्रशासन या प्रकरणात गप्प बसले असल्याचा आरोप होत आहे.
“चोर कितीही मोठा असला तरी चोरच असतो. अपहर केलेला पैसा संस्थेत जमा झाला तरी गुन्हा धुतला जात नाही. आरोपींवर तातडीने गुन्हा दाखल न केल्यास सभासद रस्त्यावर उतरतील,” असा इशारा ऊस उत्पादक सभासदांनी दिला आहे.