नींबुत च्या सतीश काकडे यांचा नादच खुळा अजित पवारांना विधानसभेला दिले भरभरून मतदान खुश होऊन स्वखर्चाने सतीश काकडे यांनी नींबूत मधील 726 महिलांना घडवली विविध ठिकाणी धार्मिक सहल.

Uncategorized

प्रतिनिधी.
दिलेला शब्द पाळणारा माणूस कसा असावा तर नींबूत च्या सतीश काकडे यांच्यासारखा तो असावा असं म्हणणं वावगं ठरणार नाही कारणही तसेच आहे.
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक गेल्या सहा महिन्यापूर्वी झाली त्या निवडणुकीमध्ये बारामती तालुक्यात एक नंबरचे मतदान हे नींबूतकरांनी अजित पवार यांना दिले त्यावेळी निंबूत येथे आनंद उत्सव साजरा करत असताना सतीश राव काकडे यांनी नींबूत मधील सर्व जाती धर्मातील महिलांना शब्द दिला होता की माझं ज्या नेत्यावरती खरंच प्रेम आहे त्या नेत्याला तुम्ही आज आपल्या गावातून कोणत्याही आमिषाला बळी न पडता भरभरून मतदान दिले त्याबद्दल मी तुम्हा सर्वांवरती खूप खुश आहे जसं महायुती सरकारने महिलांना लाडकी बहीण योजना चालू करून महिलांचा सन्मान केला त्याच पद्धतीने मी देखील नींबूत गावातील सर्व महिला सांगतील त्या ठिकाणी स्वखर्चाने सहलीची व्यवस्था करून देणार आहे आणि त्याच शब्दाची आज वचनपूर्ती करीत असताना सुरुवातीला मे महिन्यामध्ये नींबूत गावातील बौद्ध समाजातील जवळपास 135 महिलांना नागपूर येथील  दीक्षाभूमीचे दर्शन घडविले.
तर मुस्लिम समाजातील 80 जोडप्यांना अजमेर येथील गरीब नवाज शरीफ दर्गा या त्यांच्या धार्मिक स्थळावरती दर्शन घडवले
राहिलेल्या सर्व इतर समाजातील महिलांसाठी 3/ 10 ते 5/10 या तीन टप्प्यांमध्ये जवळपास 510 महिलांना आयोध्या व काशी दर्शन घडवीत आहेत.

सदरच्या या धार्मिक स्थळावरील पर्यटनाचा, जेवणाचा, आरोग्याचा, राहण्याचा, बिसलरीच्या पिण्याच्या पाण्याचा शंभर टक्के खर्च स्वतः सतीश काकडे यांनी यांनी केलेलाआहे
तसेच या महिला फिरण्यासाठी घेऊन जात असताना रेल्वेमध्ये महिलांना आरक्षित स्लीपर कोच सीट उपलब्ध करून दिलेले होते. तसेच या महिलांच्या सेवे करता प्रत्येकी 20 महिलांच्या समवेत तीन मुलं स्वयंसेवक म्हणून काम करीत आहेत.
मागील काही महिन्यांमध्ये नागपूर व अजमेर दौरा पार पडल्यानंतर मुस्लिम बांधव व बौद्ध समाजातील महिलांनी सुंदर ट्रिप पार पडली त्याबद्दल सतीश राव काकडे यांचा सत्कार समारंभ ठेवला होता. यावेळी सत्काराला उत्तर देताना काकडे यांनी सांगितले होते की आपण माझा सत्कार घेण्याची काहीही गरज नव्हती खरंतर तुम्ही गेल्या 40 /45 वर्षापासून माझा शब्द एकदाही खाली पडू दिलेला नाही आणि तुम्ही सर्व महिला माझ्यासाठी गाव नसून माझ्या घरातल्याच आहात त्यासाठी सत्काराची खरंतर काही आवश्यकता नव्हती. जसं सर्व गाव मी माझं कुटुंब म्हणून आज पर्यंत सांभाळत आहे तसंच भविष्यात देखील माझा मुलगा अभिजीत काकडे यांनी सुद्धा गावातील प्रत्येक समाजातील व्यक्तीला माझ्या कुटुंबातील व्यक्ती म्हणूनच पहावे व गावातील नागरिकांना नेहमी मदत करावी अशी मी त्याच्याकडून देखील अपेक्षा ठेवीत आहे असे देखील यावेळी बोलताना काकडे यांनी सांगितले.