सतिशभैया कल्याणकारी संघ निंबूत, आयोजित *होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमात* रविवार दिनांक 12 /10 /2025 रोजी निंबूत व परिसरातील तीनशे ते साडेतीनशे महिलांनी सहभाग घेतला. श्री .बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालयाच्या प्रांगणात या खेळाचे आयोजन करण्यात आले होते .

Uncategorized

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय सविताताई काकडे देशमुख , सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक सन्माननीय अभिजीत भैय्या काकडे देशमुख, निंबूत ग्रामविकास प्रतिष्ठानच्या संचालिका सन्माननीय तेजस्विनीताई काकडे देशमुख शेतकरी कृती समितीचे सरचिटणीस सन्माननीय मदन भैया काकडे देशमुख तसेच विविध महिला बचत गटाच्या संचालिका आणि एम चॅनेल चे प्रमुख वार्ताहर सन्माननीय मधुकर बनसोडे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी झी टीव्ही हास्य सम्राट फेम राहुल भालेराव यांनी सूत्रसंचालन त्यांच्या नेहमीच्या खुमासदार शैलीत केले.
या पैठणीच्या खेळासाठी 36बक्षिसांचा समावेश करण्यात आला होता .प्रथम बक्षीस टिव्ही व पैठणी, दुसरे बक्षिस बनारसी साडी व चांदीचा छल्ला, तिसरे बक्षीस टेबल फॅन, चौथे बक्षीस मिक्सर, पाचवे बक्षीस बनारसी साडी, सहावे बक्षीस चांदीचे नाणे सातवे बक्षीस प्रेशर कुकर, आठवे इलेक्ट्रिक इस्त्री, नववे किचन सेट, दहावे डिनर सेट बारावे पाण्याचा जार तसेच 14 ज्वेलरी बॉक्स अशी एकूण 36 बक्षीस ठेवण्यात आली होती.

गावातील महिलांना रोजच्या कामातून थोडा वेगळा अनुभव तसेच आपल्या मधील असणाऱ्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी हे व्यासपीठ खास ठरले. होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमात विविध वयोगटातील, विविध भागातील महिला सहभागी झाल्या होत्या. हास्य ,अभिनय ,विविध गंमती दार खेळ, संगीत खुर्ची, चेंडू फेक, उखाणे ,नृत्य अशा कार्यक्रमाचे रेलचेल या ठिकाणी महिलांना अनुभवयास मिळाली. एरवी शांत दिसणाऱ्या महिला खेळाच्या व्यासपीठावर खुलल्या होत्या .उत्कृष्ट ध्वनी संयोजन, उत्कृष्ट स्टेजव्यवस्था यामुळे कार्यक्रमाला रंगत आली. महिलांपुढे विविध आकर्षक बक्षिसे जिंकण्याचे आव्हान असल्यामुळे निकोप स्पर्धात्मक वातावरण तयार झाले होते.
या *कार्यक्रमात मायबोली वाहिनी फेम ट्रेंडिंग सुपरस्टार* *विजेती प्रणोती कदम आणि मिस राजधानी सातारा विजेती 2025 सानिका लोहार* यांनी आपल्या अनोख्या नृत्य शैलीत* नृत्य सादर करून सर्व प्रेक्षकांची मने जिंकली .

मान्यवरांच्या शुभ हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आली .स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे….
प्रथम प्रतीक्षा पवार
दुसरा अनिता साळवे
तिसरा शीतल काकडे
चौथा शितल निकम
पाचवा उषा पवार
सहावा प्रज्ञा पालव
सातवा पद्मिनी जंगम
आठवा पूजा पवार
नववा वर्षा राणी काकडे
दहावा नीता पवार
अकरावा सुहानी धुमाळ.
*पुरुष गटातून मा. मदनराव काकडे यांनी शहेनशाह चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा डायलॉग बोलून पाण्याचे जार हे बक्षीस पटकावले.*
सर्व महिलांना या बाबत समाधान व्यक्त केले.
मधुकर बनसोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.