बारामती ! बारामतीत नगर परिषद शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा

Uncategorized

 .

बारामती – प्रतिनिधी

देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त बारामती नगरपरिषद शाळा क्र.२ येथे ‘वाचन प्रेरणा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतींना वंदन करून विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व जाणले.

यानिमित्ताने या उपक्रमातून विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. वाचन प्रेरणा दिनानिमित्त मुलांना गोष्टींची, कवितांची आणि ज्ञानवर्धक पुस्तकांची ओळख करून देण्यात आली. भविष्यात प्रत्येक विद्यार्थ्याने नियमित वाचन करावे आणि वाचनाची गोडी लावून घ्यावी, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका वृषाली धालपे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अविनाश कवडे उपस्थित होते.