संपादक मधुकर बनसोडे.
गेल्या एक वर्षाभरापासून सोमेश्वर नींबूत वानेवाडी मुरूम व परिसरातील शेतकऱ्यांच्या मोटर व विद्युत केबल वायर चोरीला जाण्याचे प्रमाण वाढलेले आहे अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी देखील दिल्याची माहिती मिळत आहे मात्र अद्यापही आरोपी नक्की कोण याचा तपास लागलेला नाही.? टिचभर पोटाला चिमटा घेऊन अहोरात्र कष्ट करून कमावलेल्या पैशातून बळीराजांनी शेतात उभ्या पिकाला पाणी देण्यासाठी विद्युत मोटर संच बसवले मात्र शेतकऱ्यांच्या प्रपंचावरती उठलेल्या काही विकृत विचारांच्या चोरांकडून त्याच्यावरती डल्ला मारण्यात आला शेतकऱ्यांच्या प्रपंचावरती उठणाऱ्या या विकृत विचारांना आळा नक्की बसणार कधी असा जाब आता शेतकरी प्रशासनाला विचारत आहे.
सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार मागील एक महिन्यापूर्वी काही संशयित विद्युत मोटर चोर यांची चौकशी सुरू होती मात्र अद्यापही कोणतीही कारवाई केलेली नसल्याचे बळीराजा बोलत आहे.
पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर बळीराजाच्या प्रपंचामध्ये विष कालवणाऱ्या या विकृत विचारांच्या भामट्या चोरांचा कायमचा बंदोबस्त करून बळीराजाला सुखाचे दिवस मिळवून द्यावेत अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून होत आहे.
संशयितांना पोलीस चौकशीच्या फेऱ्यातून वाचवण्यासाठी काही स्थानिक राजकीय पुढारी लुडबुड करत असल्याचे देखील काही शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे मात्र पोलीस प्रशासन बळी न पडता निपक्षपातीपणे काम करून आरोपींना धडा शिकवतील अशी आशा शेतकरी वर्गामधून व्यक्त होत आहे