• Home
  • माझा जिल्हा
  • निंबूत-कांबळेश्वर जिल्हा परिषद गटात भाजपच्या नव्या कार्यक्षम चेहऱ्याचे नाव चर्चेत.
Image

निंबूत-कांबळेश्वर जिल्हा परिषद गटात भाजपच्या नव्या कार्यक्षम चेहऱ्याचे नाव चर्चेत.

| प्रतिनिधी.

निंबूत-कांबळेश्वर जिल्हा परिषद गटातील निवडणुकीवर राजकीय निरीक्षकांचे लक्ष असताना, या गटात भारतीय जनता पक्षाने आता आक्रमक मोड घेतला आहे. भाजपकडून संभाव्य उमेदवार म्हणून तरुण आणि कार्यक्षम चेहरा म्हणून ओळखले जाणारे दिग्विजय काकडे यांचे नाव चर्चेत आले आहे. यामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे. बारामती तालुका हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो मात्र या बालेकिल्लांमध्ये भाजपचे दिग्विजय काकडे यांच्या नावाची सध्या मतदारसंघांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे

भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या दिग्विजय काकडे यांनी बारामती तालुक्यात पक्षाची विचारसरणी आणि विकासधोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पक्षातील वरिष्ठ नेते, पदाधिकारी तसेच शेतकरी,विविध पंथ-जात-धर्म आणि राजकीय विचारांच्या लोकांशी त्यांनी उत्तम सुसंवाद जपला आहे. त्यामुळे ‘विभाग नाही, संवाद हीच ताकद’ अशी त्यांची प्रतिमा स्थानिक पातळीवर दृढ झाली आहे.

पुणे जिल्हा भाजप किसान मोर्चा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी अनेक जनहितकारी उपक्रम हाती घेतले.
रक्तदान शिबिरे.
गरजूंसाठी शैक्षणिक साहित्य वाटप.
दिवाळीपूर्वी साखर व रेशनकिट वाटप.
सर्वरोग निदान शिबिरे.
बांधकाम कामगार आणि सर्वसाधारण कुटुंबांना भेडसावणाऱ्या प्रश्नांसाठी तातडीची मदत.
या सर्व माध्यमांतून त्यांनी जनतेत विश्वास निर्माण केला आहे.
तरुण पिढीशी असलेले दिग्विजय काकडे यांचे संबंध पाहता तरुण पिढी एकत्रित ठेवण्याची क्षमता दिग्विजय काकडे यांची दिसून येते

शैक्षणिक मार्गदर्शन, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांत युवकांचा सहभाग वाढावा यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला. “राजकारण म्हणजे केवळ निवडणूक नव्हे, तर सतत सामाजिक जबाबदारी पार पाडणे” असा त्यांचा कार्यधर्म स्थानिकांमध्ये पसंत पडला आहे.

भाजपमध्ये प्राथमिक चर्चा सुरू असून
भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी असलेला संवाद पाहता दिग्विजय काकडे यांना उमेदवारी देण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचे दिसत आहे.
एकंदरीत निंबूत कांबळेश्वर गटामधील नागरिकांशी असलेला संवाद पाहता मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची क्षमता काकडे यांच्यामध्ये दिसून येते

Releated Posts

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025