मोरगाव – प्रतिनिधी
वंदे मातरम या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याचा निमित्ताने आम्ही बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात सामूहिक वंदे मातरम गायन करण्यात आले.
विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. विद्यालयातील शिक्षक सोमनाथ डगळे यांनी वंदे मातरम या गीताच्या निर्मितीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. वंदे मातरम च्या गायनानंतर सर्व विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत उपक्रम पार पडला. यावेळी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक बाळू बालगुडे, महेंद्र कुतवळ, नूतन काळाणे, लीना कराड, शुभांगी भापकर उपस्थित होते.