मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
इतर

रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल वडगाव निंबाळकर वार्षिक स्नेहसंमेल उत्साहात पार .

mnewsmarathi 28 Dec 2022 1 मिनिट वाचन 9,062 वाचन

प्रतिनिधी – फिरोज भालदार

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय चांगल्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अध्यक्ष वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे हे होते .

वडगाव निंबाळकर रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सहाय्यक पोलीस निरीक्षण सोमनाथ लांडे यांचा कौतुकाचा वर्षाव वडगाव निंबाळकर अतिशय अल्पावधीत शाळेने शिक्षणाचा दर्जा अतिशय चांगला ठेवून या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एक चांगली शैक्षणिक संस्था तयार करण्याचे काम संस्थेचे अध्यक्ष कंचनकाटे व माधव काटे यांनी केले आहे. असे मत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्नेहसंमेलन वेळी आपले मनोगत व्यक्त करताना वरील विधान मांडले. प्रमुख पाहुणे म्हणून वडगाव निंबाळकर चे सरपंच सुनील ढोले उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायतचे सदस्य संजय साळवे, अजित भोसले ,प्रमोद किरवे, महिला सदस्य प्रेमलता रांगोळे, मयुरी साळवे अश्विनी खोमणे, जय मल्हार क्रांती संघटनेच्या बारामती तालुका महिला अध्यक्ष अलकाताई भंडलकर, जय मल्हार क्रांती संघटनेच्या पुणे जिल्हा युवती अध्यक्ष तेजश्री भंडलकर, बहुजन हक्क परिषदेचे बारामती तालुका युवक अध्यक्ष अमोल गायकवाड , प्राचार्य श्रद्धा मासकर ,शिक्षिका दिपाली नलावडे ,विद्या कोकरे ,सुवर्णा बनकर व वडगाव निं. ग्रामस्थ मोठ्या संख्येने या वार्षिक स्नेहसंमेलनात उपस्थित होते. यावेळी वडगाव निंबाळकर चे सरपंच सुनील ढोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कृष्णा जाधव,शुभम भोसले, शुभम गावडे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची कोरिओग्राफी करुन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी गायकवाड व कृष्णा जाधव यांनी केले. व आभार कांचन काटे यांनी मानले.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi