1 min read

निबुत मध्ये शेतातील विद्युत मोटर चोरीचे सत्र सुरूच.

प्रतिनिधी.

मागील अनेक दिवसांपासून नींबूत व नींबूत परिसरातील शेतीतील मोटर चोरीचे सत्र काही थांबायचे नाव घेईन शेतकऱ्याने पै पै जोडून शेतातील उभ्या पिकाला पाणी देण्याकरिता हजारो रुपये खर्च करून विद्युत संच विकत घेतले मात्र काही विकृत विचारांच्या भुरट्या चोरांमुळे शेतकऱ्याचे शेतातील उभे पीक जळून जाण्याच्या मार्गावरती आले आहे शनिवारी रात्री ज्ञानेश्वर भुजंगराव काकडे यांच्या शेतातील पाच एचपी विहिरीवरील पाण्यातील मोटर चोरीला गेल्याचे काकडे यांचा मुलगा याच्या सकाळी निदर्शनास आले काकडे यांनी भ्रमणध्वनी वरून आमच्याशी संपर्क साधून बोलत असताना सांगितले की सदरचे चोर हे आपल्याच परिसरातील असू शकतात
आज पाच एचपी ची मोटर जर घ्यायची म्हटलं तर किमान 30 हजार रुपयांपर्यंत मिळते मात्र हे चोर मोटर चोरी केल्यानंतर किरकोळ किमतीला विकत असतील विकत घेणाऱ्याने देखील चोरीच्या मोटारी केबल घेऊ नयेत जर आज हे चोर दुसऱ्याची मोटर चोरून आपल्याला देत असतील तर भविष्यात आपली चोरी करून दुसऱ्याला का देणार नाहीत त्यामुळे आपणच अशा विकृत विचारांच्या लोकांपासून सावध राहून काही माहिती मिळाल्यास किंवा काही माहिती असल्यास देशाचे सुजाण नागरिक म्हणून पोलीस प्रशासनास माहिती दिली पाहिजे.
पोलीस प्रशासनामध्ये दबंग अधिकारी आहेत मला पूर्ण विश्वास आहे ते माझी चोरी केलेली मोटर मला मिळवून देतील व आरोपींना नक्कीच शासन मिळवून देतील याबद्दल तीळ मात्र शंका माझ्या मनात नाही.
असे काकडे यांनी बोलताना सांगितले