कोऱ्हाळे बुद्रुक येथील लव्हे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याला कचऱ्याचे साम्राज्य 
1 min read

कोऱ्हाळे बुद्रुक येथील लव्हे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याला कचऱ्याचे साम्राज्य 

 प्रतिनिधी
कोऱ्हाळे बुद्रुक गावातील नीरा बारामती रस्त्यावरून लव्हेवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा व राडारोडा टाकल्याने त्या भागात राहणाऱ्या लोकांचे व विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

या रस्त्याला नेहमीच चायनीज व चिकन विक्रेत्यांचा राडारोडा, केशकर्तनालयातील केस, फाटकी कपडे, जेवणावळीतील पत्रावळ्या, मृत जनावरे, दुकानातील कचरा टाकला जातो. त्यामुळे परिसराला मोठी दुर्गंधी येते. वस्तीकडे जाताना नाकाला रुमाल लावून जावे लागते. शिवाय अनेक विद्यार्थी या रस्त्यावरून जातात. त्यांना हा मोठा त्रास होत असल्याचे चित्र आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुनील खोमणे यांनी कोऱ्हाळे बुद्रुक ग्रामपंचायतीला अनेकदा तोंडी तक्रार केली होती. मात्र तरीही कचऱ्याची समस्या न सुटल्याने खोमणे यांनी याबाबत ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज दाखल केला आहे.
याबाबत बोलताना ग्रामविकास अधिकारी राजेंद्र शिंदे म्हणाले की ग्रामपंचायत कार्यालयाने कचरा गाडी खरेदी केली असून त्या गाडीचे आरटीओ पासिंग या आठवड्यात होणार असून लवकरच कचऱ्याची समस्या सुटणार आहे.