पुणे जिल्हा परिषदेत यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धा नींबूत मध्ये पडल्या पार.
प्रतिनिधी.
पुणे जिल्हा परिषदेत यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा नींबूत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पार पडल्या या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला या स्पर्धेमध्ये जवळपास सहा जिल्हा परिषद च्या शाळांनी सहभाग नोंदवला.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक अभिजीत काकडे, नींबूत ग्रामपंचायत चे विद्यमान उपसरपंच अमरदीप काकडे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार काकडे यांच्या शुभहस्ते ग्राउंड पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
या स्पर्धेसाठी नींबूत ग्रामपंचायत च्या वतीने स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्र, विजेत्या खेळाडूंना ट्रॉफी, मेडल देण्यात आले होते. तर निमित्त मधील काही तरुणांनी एकत्र येत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम प्रकारे भोजन व्यवस्था देखील केलेली होती.
आरोग्य विभागाच्या वतीने देखील यावेळी स्पर्धकांना दुखापत झाली तर प्राथमिक उपचारासाठी स्टाफ उपलब्ध करून देण्यात आला होता.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन. शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दगडे सर, अनपट सर, शेंडकर मॅडम व त्यांच्या सहकारी टीम ने केले होते.
या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, पीएसआय वारुळे, पोलीस हवालदार नागटिळक, विक्रम काकडे, नंदकुमार काकडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी साबळे यांनी बोलताना सांगितले की अभ्यासाबरोबर खेळ देखील खूप महत्त्वाचा आहे खेळामुळे आरोग्य सुधारते व आरोग्य उत्तम असेल तर अभ्यासात चांगले लक्ष राहते अभ्यासाबरोबर मैदानी खेळाचे महत्व राहुल साबळे यांनी सांगितले.
आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत शशी अनपट यांनी केले तर आभार दगडे सर यांनी मानले
