ग्रामपंचायत निंबूत येथे संविधान दिन उत्साहात साजरा.
प्रतिनिधी.
ग्रामपंचायत नींबूत येथे आज सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
यावेळी नींबूत ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार काकडे यांनी संविधानाचे महत्त्व संविधानामुळे मिळालेले अधिकार याबाबत माहिती लोकांना दिले.
या कार्यक्रमासाठी नींबूत तलाठी तनपुरे मॅडम, ग्रामपंचायत क्लार्क भाऊसो कोळेकर, सोमनाथ महानावर, सिद्धनाथ काळे, राजेंद्र काकडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
