सोमेश्वर विद्यालयात संविधान दिन साजरा
1 min read

सोमेश्वर विद्यालयात संविधान दिन साजरा

सोमेश्वरनगर ( वा ),
श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर विद्यालय आंबी बुद्रुक येथे संविधान दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
यावेळी गावातून ढोल ताशाच्या गजरात संविधान रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी यावेळी आपला अभिमान आपले संविधान अशा घोषणा देत जनजागृती केली. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबी बुद्रुकचे विद्यार्थीही सहभागी झाले होते. त्यानंतर विद्यालयाच्या प्रांगणात मानवी साखळी तयार करुन संविधानाचा जयघोष करण्यात आला.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाचे पूजन करण्यात आले. विद्यालयातील शिक्षक बाळू बालगुडे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले तर विद्यालयातील शिक्षक हेमंत गडकरी यांनी संविधानाची निर्मिती, रोजच्या जीवनात संविधानाचे स्थान या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच रचना दुरगुडे या विद्यार्थीनीने संविधान या विषयावर मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेसमोर सेल्फी काढल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष जेधे यांनी केले.