• Home
  • माझा जिल्हा
  • डीआरआयने पुणे येथे तस्करी करण्यात आलेल्या बनावट चलनी नोटा जप्त केल्या
Image

डीआरआयने पुणे येथे तस्करी करण्यात आलेल्या बनावट चलनी नोटा जप्त केल्या

प्रतिनिधी

महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) दिलेल्या  विशिष्ट माहितीच्या आधारे  पुणे प्रादेशिक शाखेच्या अधिकाऱ्यांनी जप्त करण्यात आलेल्या तस्करीच्या बनावट भारतीय चलनी नोटा  प्रकरणी  गुन्हा नोंदवला आहे.

पुणे विभागाच्या सीमा शुल्क अधिकाऱ्यांच्या समन्वयाने आणि सहकार्याने बुधवारी  (12 ऑक्टोबर 2022) ही कारवाई करण्यात आली. अधिकार्‍यांच्या पथकाने त्वरीत कारवाई करत  खडकी बाजार लेनमधून मोटारसायकल चालवणाऱ्या आणि एल्फिन्स्टन रोड ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला पकडले. प्रत्येकी 500/- रुपये मूल्य असलेल्या एकूण 400  भारतीय बनावट चलनी नोटा ज्याचे दर्शनी मूल्य 2 लाख रुपये आहे, त्या सीमा शुल्क कायदा, 1962 च्या तरतुदीनुसार त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या.

तसेच, तस्करीच्या बनावट भारतीय चलनी नोटा पुरवठ्यात सहभागी असलेल्या आणखी दोघांना डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी पकडले आहे. या बनावट नोटा बांगलादेशातून भारतात आणण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.  या प्रकरणी वर नमूद केलेल्या तीन आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Releated Posts

सोलापुरात संत गजानन महाराज आणि सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या पालखी भेटीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

प्रतिनिधी सोलापुरात संत गजानन महाराज आणि सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या पालखी भेटीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.…

ByBymnewsmarathi Jul 19, 2026

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026