तीन दिवस संपावर जात असताना सुद्धा. महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून’ नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी केली आवाहन.

Uncategorized इतर

संपादक मधुकर बनसोडे

पिण्याच्या पाण्याच्या टाक्या भरून घ्या मोबाईल मध्ये चार्जिंग करून ठेवा तीन दिवसाच्या संपामुळे महावितरण कर्मचाऱ्यांचे नागरिकांना आवाहनखासगीकरणाला विरोध करण्यासाठी महावितरणचे अधिकारी- कर्मचारी यांनी 4 ते 6 जानेवारी हे तीन दिवस संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. या काळात वीजपुरवठा करण्याची जबाबदारी केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांची असणार असल्याने मोबाईल चार्ज करून ठेवा, पाण्याच्या टाक्या भरून घ्या, दळण दळून ठेवा असे आवाहन महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केले आहे. अदानी समुहाला वीजवितरणाचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू आहेत.

त्याला विरोध करण्यासाठी 30 संघटनांनी आज मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी संघर्षं समितीने म्हटले आहे की, संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व वीज कर्मचारी संपावर राहतील. हा संप नागरिकांना त्रास होईल अशा उद्देशाने बिलकुल नाही.आम्हाला काही मिळवायचे आहे असा सुद्धा या संपा मागे उद्देश नाही. पण फ्री सिम देऊन हळूहळू बीएसएनएल कंपनी जशी गिळंकृत केली तशी सार्वजनिक उद्योग महावितरण गिळंकृत करायला कोणी येत असेल तर त्याला हा विरोध आहे.