महावितरणचे अधिकारी कर्मचारी यांचा संप नक्की कोणासाठी?.

इतर

संपादक मधुकर बनसोडे.

कालपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या व्हाट्सअप वरती एक संदेश दिसत आहे महावितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी जाणार संपावर ती. अधिकारी संपावर ती जात असताना वीज पुरवठा चालूच राहणार आहे मात्र काही तांत्रिक बिघाड झाल्यास तो दुरुस्त करण्यासाठी संप काळात संपावर ती असणारे अधिकारी कर्मचारी उपलब्ध होणार नाहीत असा तो मेसेज आहे. मात्र महावितरणचे अधिकारी कर्मचारी यांना संपावर ती जाण्याची वेळ का आली आहे का करावा लागत आहे नक्की संप. मिळालेल्या माहितीनुसार महावितरण खाजगीकरण करण्याकडे वाटचाल सुरू आहे आणि जर हे खाजगीकरण झाले तर सामान्य नागरिकांना सुद्धा हे परवडणारे नाही जसं मोबाईलचा रिचार्ज अगोदर करावा लागतो त्याचप्रमाणे वीज वापराचे पैसे हे अगोदर भरावे लागतील भरलेले पैसे संपले की त्वरित वीज पुरवठा खंडित? त्यामुळे खाजगीकरण परवडणारे नाही खाजगीकरण झाल्यास सरकारचे देखील यावरती काहीही नियंत्रण राहणार नाही?