मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
इतर

वडगाव निंबाळकर रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे पत्रकार सन्मान सोहळा संपन्न.

mnewsmarathi 06 Jan 2023 1 मिनिट वाचन 9,326 वाचन

वडगाव निं.प्रतिनिधी -फिरोज भालदार

आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहीले ‘दर्पण’ हे वृत्तपत्र ६ जानेवारी १८३२ साली सुरु केले .त्यास स्मरण म्हणून महाराष्ट्र सरकारने ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून घोषित केला आहे .त्यामुळे संपूर्ण राज्यभरात हा दिवस पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल वडगाव निंबाळकर 11. फाटा येथे पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा संपन्न पार पडला. यामध्ये सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला .यावेळी भरतीय पत्रकार संघाचे बारामती अध्यक्ष काशिनाथ पिंगळे , दलित पॅंथर बारामती तालुका अध्यक्ष शंतनू साळवे, फिरोज भालदार, सुनील जाधव , व रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या अध्यक्षा कांचन काटे , प्रिन्सिपल श्रद्धा मस्कर , दिपाली नलवडे , पल्लवी गायकवाड , सुवर्णा बनकर , निकिता पवार हे उपस्थीत होते. सूत्रसंचालन श्रद्धा मस्कर मॅडम यानी केले व रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या अध्यक्षा कांचन काटे मॅडम यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करून सर्व पत्रकार बांधवांचे पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व उपस्थीतीबद्दल आभार मानले.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi