ठाणे जिल्ह्यात भिवंडीमध्ये पारशनाथ कंपाउंड येथील कोकोकार्ट उद्योगावर भारतीय मानक ब्युरो अधिकाऱ्यांचा छापा

Uncategorized

प्रतिनिधी

खेळणी गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे (क्यूसीओ) उल्लंघन केल्याच्या माहितीवरून कारवाई करत, भारतीय मानक ब्युरो, मुंबई शाखा कार्यालय-II च्या अधिकाऱ्यांच्या पथकाने 03.01.2023 रोजी मेसर्स कोकोकार्ट व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड, पारशनाथ कंपाउंड भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र येथे छापे टाकले.कंपनीने सॉफ्ट टॉयसोबत येणारी विविध प्रकारची किंडर जॉय चॉकलेट टी (4×3) 150 ग्रॅम आयात केली. खेळणी गुणवत्ता नियंत्रण आदेशानुसार (क्यूसीओ ), सर्व खेळणी आयएस 9873-भाग 1 नुसार भारतीय मानक ब्युरोकडून प्रमाणित असणे आणि त्यावर वैध बीआयएस परवाना क्रमांक असलेले मानक चिन्ह असणे आवश्यक आहे. शोध आणि जप्ती दरम्यान सापडलेली खेळणी आयएस 9873 नुसार बीआयएस प्रमाणित नव्हती ,हे खेळणी गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे उल्लंघन असल्याचे, या छापे कारवाईत आढळून आले. ही खेळणी विमानतळावरील विविध प्रमुख ठिकाणी विकण्यात कंपनीचा सहभाग होता हे दर्शवणारे पुरेसे साहित्य जप्त करण्यात आले असून देयकांच्या प्रती जमा करण्यात आल्या आहेत. बीआयएस कायदा 2016 च्या कलम 17(1) चे उल्लंघन या गुन्ह्यासाठी न्यायालयात खटला दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.त्यामुळे , सर्व ग्राहकांना बीआयएस प्रमाणित असलेल्या अनिवार्य उत्पादनांची यादी शोधण्यासाठी बीआयएस केअर ॲप (मोबाइल अँड्रॉईड + आयओएस दोन्हीमध्ये उपलब्ध) वापरण्यास प्रोत्साहित केले जात आहे आणि बीआयएस संकेतस्थळ http://www.bis.gov.in ला भेट देऊन खरेदी करण्यापूर्वी उत्पादनावरील आयएसआय चिन्हाची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात येत आहे