प्रतिनिधी.
निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात आज वार शनिवार दिनांक २१/ ०२ /२०२६ रोजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोगी पाककला उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमामध्ये इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी स्वच्छता, सुरक्षितता यांची माहिती घेऊन पदार्थ तयार केले. या पाककला उपक्रमात विद्यार्थ्यांनी पोहे,पाणीपुरी, मिसळ पाव, पुरीभाजी, पावभाजी, वडापाव, चहा, चपाती व भाजी, बेसन भाकरी, कांदा भजी, भेळ, बाजरी भाकरी, झुणका, ठेचा इत्यादी पदार्थ तयार केले. तसेच हे सर्व पदार्थ विद्यार्थांनी पारंपरिक चुली व सरपण वापरून तयार केले. पदार्थ तयार करण्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू विद्यार्थ्यांना पालकांनी उपलब्ध करून दिल्या होत्या.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संघ भावना, नियोजन कौशल्य व जबाबदारीची जाणीव निर्माण झाली.पालकांची चांगले सहकार्य लाभले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वयंपाक करताना घ्यावयाच्या काळजी,सुरक्षा बाबत सूचना दिल्या व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक करून अशा उपक्रमामुळे जीवनोपयोगी कौशल्यांचा विकास होतो असे मत व्यक्त केले.
या उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. सतीशभैया काकडे देशमुख व ज्येष्ठ संचालक मा. श्री. भीमराव बनसोडे सर व पालक यांनी सदिच्छा भेट देऊन मुलांनी तयार केलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतला व कौतुक केले.
संस्थेच्या उपाध्यक्ष मा. सौ. सुप्रियाताई अश्विनकुमार पाटील तसेच संचालिका सौ सविताताई सतीश काकडे दे., मानद सचिव मा.श्री. मदनराव काकडे देशमुख यांनी पाककृतीतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.













