Skip to main content

  • Home
  • ताज्या बातम्या
  •  श्री सोमेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Image

 श्री सोमेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

प्रतिनिधी.

श्री सोमेश्वर सेवाभावी संस्था,सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट,ग्रामपंचायत करंजे,आजी माजी सैनिक संघटना,पत्रकार संघ यांच्या संयुक्त विध्यमाने आयोजित या उपक्रमास सोमेश्वर पंचक्रोशीतील भाविक, युवक वर्ग व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ७५ बॉटल रक्त संकलन करून मानवतेचा संदेश दिला.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते रक्तदान करून करण्यात आली. यावेळी विद्यमान सरपंच भाऊसाहेब हुंबरे, निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब शिंदे, सोमेश्वर देवस्थान ट्रस्टचे चेअरमन आनंत मोकाशी, सचिव विपुल भांडवलकर, करंजे गावचे मा.उपसरपंच संताजीराव गायकवाड, विश्वस्त मोहन भांडवलकर, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव शेंडकर, खजिनदार सचिन भांडवलकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रतापराव गायकवाड, सिरम इन्स्टिटय़ूट पुणे अधिकारी सोमनाथ गोळे,सोमेश्वर देवस्थानचे पुरोहित ऋषिकेश घोलप आदी मान्यवर उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी स्वतः रक्तदान करून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.

या रक्तदान शिबिरासाठी बालाजी ब्लड बँक सेंटर लोणंद यांचे विशेष सहकार्य लाभले. डॉक्टर अनिकेत उघडे, समाधान माने-देशमुख (जनसंपर्क अधिकारी), गौरी काळे (टेक्निशियन) तसेच वैद्यकीय कर्मचारी यांनी सुरक्षित, शिस्तबद्ध व वैज्ञानिक पद्धतीने रक्तसंकलन प्रक्रिया पार पाडली.

सहा वर्षांची अखंड सामाजिक परंपरा

श्री सोमेश्वर सेवाभावी संस्था,सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट,ग्रामपंचायत करंजे मागील सहा वर्षांपासून नियमित रक्तदान शिबिरे, आरोग्य जनजागृती व समाजोपयोगी उपक्रम राबवत असून परिसरात सेवाभावाची मजबूत परंपरा निर्माण करत आहे. या उपक्रमांमुळे अपघातग्रस्त, रुग्णालयातील रुग्ण व आपत्कालीन परिस्थितीत अनेकांचे प्राण वाचविण्यास मदत होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेव शिंदे यांनी सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार मानताना सांगितले की, “आपल्या सहकार्यामुळे समाजकार्याला प्रेरणा मिळते. रक्तदान ही केवळ सेवा नसून जीवनदान देण्याची महान भावना आहे.” त्यांनी युवकांनी अशा सामाजिक कार्यात सातत्याने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व सेवाभावाने परिपूर्ण वातावरणात पार पडला. पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
.

Releated Posts

कै. बाबालाल साहेबराव काकडे – देशमुख स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन

प्रतिनिधी. मुगुटराव साहेबराव काकडे महावि‌द्यालय, सोमेश्वरनगर मध्ये संस्थेचे माजी अध्यक्ष कै. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त ०१…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

बारामती! वडगाव निंबाळकर पोलिसांत दोघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; मोराळवाडी येथील घटना.

प्रतिनिधी – फिरोज भालदार जातीवाचक शिवीगाळ करून सार्वजनिक ठिकाणी अपमानित करणे तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर…

ByBymnewsmarathi Aug 7, 2026

राष्ट्रीय आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेत एआयसीटी डिझाईन अकादमीचे घवघवीत यश; निंबुतच्या गाथा काकडेचा विशेष सत्कार

प्रतिनिधी. पिंपरी-चिंचवड, दि. ७ (प्रतिनिधी): जेईई (बी.आर्किटेक्चर) आणि नाटा (NATA) या राष्ट्रीय स्तरावरील आर्किटेक्चर प्रवेश परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश…

ByBymnewsmarathi Aug 7, 2026

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरातून लाभार्थ्यांना तात्काळ दिलासा; ७५ पारधी बांधवांना जातीचे दाखले

प्रतिनिधी. बारामती, दि. ६ ऑगस्ट : सोमेश्वर इंजिनीअरिंग कॉलेज येथे दि. २ व ३ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित…

ByBymnewsmarathi Aug 6, 2026