• Home
  • क्राईम
  • नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी
Image

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी

पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन त्या नागरीकांना परत करणे संदर्भात मा.श्री. संदीप सिंह गिल्ल सो. (मा.पो.से) पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण पोलीस दलातील माळेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातुन नागरीकांचे हरविलेले मोबाईल अनुषंगाने माळेगाव पोलीस ठाणे येथे प्राप्त तकारी संदनांत स.पो.नि. श्री सचिन लोखंडे, प्रभारी अधिकारी, माळेगाव पोलीस ठाणे यांनी गोपनीय शाखेचे पोलीस नाईक श्री. ज्ञानेश्वर सानप यांना हरविलेल्या मोबाईल संदर्भात प्राप्त तकारीचे अवलोकन करुन तांत्रिक विश्लेषण करुन त्याचा शोध घेणेकरीता नेमणुक केलेली आहे

त्या अनुषगाने बारामती तालुक्यातील श्री.जयदीप बाळासो कदम रसांगवी यांचा 116000 रुपये किमतीचा (सॅमसंग गॅलॅक्सी अल्ट्रा 23 कंपनी), श्री. राजवर्धन सतिश कुंभार रा. माळेगाव बु नागेश्वरनगर यांचा 42999 रुपये किंमतीचा (सॅमसंग गॅलेक्सी एस 23), श्री.शंकर सायबु पवार रा. राननगर माळेगाव बु।। यांचा 36000 रुपये किंमतीचा (विवो व्ही 30), श्री. कल्याण खाशाबा जाधव रा.जळगाव सुपे यांचा 29999 रुपये किंमतीचा (ओप्पो एफ 27 प्रो), श्री गजानन गणपत कानडे रा. पेडगाव ता श्रीगोंदा जि.अ.नगर यांचा 20500 रुपये किंमतीचा (वियों), श्री. निलेश लालासी जगताप रा. सांगवी यांचा 20500 रुपये किमतीचा (ओप्पो ए 79), श्री.अक्षय धनंजय कुतवळ रा. कुलवळवाडी यांचा 18600 रुपये किंमतीचा (वियो यही 29), कु. पुर्वा जयराम खारतोडे रा.शिवनगर माळेगाव यांचा 16499 रुपये किंमतीचा (विवो वाय 22), सौ. सुप्रिया विक्रमसिंह खलाटे रा. कांबळेश्वर यांचा 16000 रुपये किंमतीचा (मोटो जी 84) श्री.रतन उध्दव पवार सध्या रा.राजधानी सलुन रोड, पिंपरी चिंचवड मुळ रा. कुरनुर ता. अक्कलकोट जि. सोलापूर याथा 15999 रुपये किंमतीचा (लावा ब्लेज), सौ. सुप्रिया नवनाथ सुर्यवंशी रा. बाकाळे यांचा 15000 रुपये किंमतीचा (दिवो बाय 20), श्री. सुनिल शहाजी शिर्के रा.माळेगाव खु।। यांचा 12499 रुपये किंमतीचा (ओप्पो ए ३), श्री.गणेश किसनराव महामुनी रा. पणदरे यांचा 11999 रुपये किनतीचा (पोको एम 16), श्री. नागेश अधिकराव खाडे रा.पुणे यांचा 9999 रुपये किंमतीचा (विवो व्ही 16), श्री. गोरख शिवराम गायकवाड रा. गोफणेवस्ती माळेगाव बु. यांचा 9500 रुपये किंमतीचा (विवो व्ही 16), श्री.अशोक महादेव लव्हे रा. बाबुजींयांचा 9500 रुपये किमतीचा (रेड मी 10 ए प्रो), श्री. निलेश नानासो कुमार रा. कन्हावागज याचा 7500 रुपये किंमतीचा (मोटोरोला जी), अशा एकुण 4 लाख 11 हजार रुपये किंमतीचे एकुण 18 मोबाईलचा शोध माळेगाव पोलीस ठाणेकडुन महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणाहुन घेणेत आलेला असुन सदरचे सर्व मोबाईल आज वार-शनिवार, दिनांक- 28/02/2026 रोजी तकार निवारण दिनाचे दिवशी वरील प्रनाणे नमुद मुळ मालकांना परत देणेत आलेले आहेत.

सदरची कामगिरी ही मा.श्री. संदीप सिंह गिल्ल सो. (मा.पो.से) पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा.श्री. गणेश बिरादार सो अपर पोलीस पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, डॉ.श्री. सुदर्शन राठोड सो. उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, व स.पो.नि. श्री. सचिन लोखंडे, प्रभारी अधिकारी, माळेगाव पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री ज्ञानेश्वर सानप गोपनीय शाखा, माळेगाव पोलीस ठाणे यांनी केलेली आहे

टिप- माळेगाव पोलीस ठाणे निर्मिती पासुन पो.ना. ज्ञानेश्वर सानप यांनी नागरीकांचे हरविलेल्या एकुण 20 लाख 22 हजार रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे व मॉडेलचे एकुण 107 मोबाईल शोध घेवुन ते माळेगाव पोलीस ठाणे कडुन नागरीकांना परत देण्यात आलेले आहेत. त्यामुळे मोबाईल मालकांनी आनंद व्यक्त केला असुन परीसरातील नागरीकांनी माळेगाव पोलीस ठाणे कडून करणेत आलेल्या कामगिरीचे कौतुक करुल समाधान व्यक्त केलेले आहे.

Releated Posts

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवडलेल्या मुसक्या 

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026