• Home
  • ताज्या बातम्या
  • श्री. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय निंबुत येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी…
Image

श्री. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय निंबुत येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी…

महान समाज सुधारक, शिक्षण प्रेमी आणि स्त्री शिक्षणाचे अग्रदूत महात्मा ज्योतिराव फुले यांची 199 वी जयंती विद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन नुकत्याच महिला पोलीस म्हणून निवड झालेल्या कु. दिशा प्रमोदराव फरांदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांची महिला पोलीस म्हणून पालघर येथे निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांनी शाल, श्रीफळ व रोप देऊन स्वागत केले.
कु. दिशा प्रमोदराव फरांदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एक ध्येय समोर ठेवून जिद्द ,चिकाटी आणि आत्मविश्वासाने जर प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळते असे मत व्यक्त केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या मनात असणाऱ्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिलीत.यातून विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन मिळाले. शाळेत असताना आपण कोणत्या गोष्टीना प्राधान्य दिले हे ही सांगितले.
याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांनी आपल्या मनोगतात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. आणि पुढे सांगितले की दिशा ताई यांचा सत्काराचा कार्यक्रम म्हणजे मुलींना प्रेरणा देण्याचा कार्यक्रम होय .
संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. सतीशभैय्या काकडे देशमुख, संस्थेच्या उपाध्यक्षा मा. सौ. सुप्रियाताई पाटील तसेच ज्येष्ठ संचालक मा. श्री.भीमराव बनसोडे सर आणि संस्थेचे मानद सचिव मा.श्री.मदनराव काकडे देशमुख यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

Releated Posts

बारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिक

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे केले अभिनंदन पुणे, दि. २९: “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वच्छ,…

ByBymnewsmarathi May 29, 2026

श्री क्षेत्र वीर येथे अभाविप बारामती आयोजित “सह्यादी स्पर्श” समर कॅम्प उत्साहात संपन्न

प्रतिनिधी. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बारामती जिल्हा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “सह्यादी स्पर्श” हा तीन दिवसीय समर…

ByBymnewsmarathi May 25, 2026

बारामती! गायीला राष्ट्रीय पशू घोषित करावे : बारामती मुस्लिम समाजाची मागणी

प्रतिनिधी – बारामती मुस्लिम समाजाच्या वतीने दिनांक २५ मे रोजी प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) तसेच बारामती…

ByBymnewsmarathi May 25, 2026

बारामती तालुक्यात गोवंश कत्तलीचा पर्दाफाश; रक्तमिश्रित साहित्य जप्त

प्रतिनिधी. माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत गोवंश जनावरांच्या अवैध कत्तलीप्रकरणी तीन जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या…

ByBymnewsmarathi May 20, 2026