• Home
  • ताज्या बातम्या
  • श्रीकांत ओव्हाळ सर यांच्या व्याख्यानाने करंजे ग्रामस्थ मंत्रमुग्ध.
Image

श्रीकांत ओव्हाळ सर यांच्या व्याख्यानाने करंजे ग्रामस्थ मंत्रमुग्ध.

प्रतिनिधी

छत्रपती शिवाजीमहाराज, ङाॅ बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा फुले, आण्णाभाऊ साठे, तुकाराम महाराज आशा कोणत्याही संत महापुरूषांना जाती धर्मात अङकवू नका. मा.श्री श्रीकांत ओव्हाळ सर. भिमरत्न बौध्द युवक संस्था करंजे, समस्त ग्रामस्थ करंजे व सोमेश्वर पंचक्रोशी यांच्या वतीने थोर समाजसुधारक महात्मा फुले व भारतरत्न ङाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त करंजे येथे त्यांचे शिवराय, ज्योतीराव ते भिमराव या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संभाजीनाना होळकर, नवनाथ उधोग समूहाचे अध्यक्ष तथा सोमेश्वर संचालक संग्रामभाऊ सोरटे यांनी केले. ओव्हाळ सर यांनी पुढे बोलताना इतिहासातील विषयांना दुजोरा दिला. त्यांनी उपस्थितांना प्रश्न केला. संभाजी महाराज यांची हत्या औरंगजेबाने 1689 साली केली.त्यावेळेस पुणे येथे राज्य कोणाचे होते.उपस्थितीत श्रोत्यामधून आवाज आला पेशव्यांचे तर संभाजी महाराज यांची हत्या झाल्यानंतर पुण्यात राज्य कोणाचे पाहीजे होते. यातून आसा अर्थ निघतो.पेशवे आणि औरंगजेब यांच्या मध्ये युती झाली आसावी, तुम्ही आम्हाला संभाजीराजे यांना पकङण्यास मदत करा आम्ही त्याबदल्यात तुम्हाला पुणे देतो.औरंगजेब दिल्ली वरून आला होता.त्याला येथील परिसराची काही माहिती नव्हती.पेशव्यांनीच संभाजीराजे यांना पकङून देण्यात मदत केली. शिवाजी महाराज रयतेचे राजे होते.ते कोणत्या एका जाती धर्माचे नव्हते.शत्रूचा देखील सन्मान करणारे शिवाजी महाराज होते.त्यांनी अनेक किस्से सांगितले. महात्मा ज्योतीराव फुले यांच्या बदल बोलताना महात्मा फुले कोणत्या राजे महाराजे यांचा वारसा आसलेल्या घरात जन्माला आले नव्हते.त्यांनी समाजासाठी समाजसुधारक म्हणून काम केले.महात्मा ज्योतीराव फुले यांचे गुरू छत्रपती शिवाजी महाराज,ङाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरू महात्मा ज्योतीराव फुले जर थोर संत समाज सुधारक यांनी आपले गुरू दुसर्‍या जाती धर्मातील मानले आसतील तर त्यांना जातीधर्मात अङकवून ठेऊ नका आसा सबुरीचा सल्ला दिला.मनुष्याने काम करत आसताना धङ आपलं, ङोकं आपलं, व मेंदू देखील स्वतःचा वापरला पाहीजे तरच जाती धर्मात वाद लागणार नाहीत.भिमरत्न बौध्द युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांना पुढील वर्षी ङाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची एक वर्षी जयंती साजरी करू नका बाबासाहेबांची जयंती जगात साजरी होते.परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करा आसे आवाहन केले. उधोजक राजेंद्र बङदे यांनी कार्यक्रम स्थळी पुस्तकांचे स्टाॅल लावले होते. उपस्थितांचे स्वागत सरपंच भाऊसाहेब हूंबरे, भिमरत्न बौध्द युवक संस्थेचे अध्यक्ष अनिल हूंबरे, यांनी केले.या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर मा.सरपंच प्रकाशराव मोकाशी,मा.उपसरपंच माऊली केंजळे,मेजर पोपट हूंबरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष सचिन पाटोळे, प्रतापराव गायकवाड, पांङूरंग हूंबरे, वसंतराव होळकर, किशोर हूंबरे, बौध्द युवक संघटनेचे कार्यकर्ते महिला भगिनी करंजे पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार तंटामुक्त समिती अध्यक्ष सचिन पाटोळे यांनी मानले.

Releated Posts

बारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिक

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे केले अभिनंदन पुणे, दि. २९: “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वच्छ,…

ByBymnewsmarathi May 29, 2026

श्री क्षेत्र वीर येथे अभाविप बारामती आयोजित “सह्यादी स्पर्श” समर कॅम्प उत्साहात संपन्न

प्रतिनिधी. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बारामती जिल्हा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “सह्यादी स्पर्श” हा तीन दिवसीय समर…

ByBymnewsmarathi May 25, 2026

बारामती! गायीला राष्ट्रीय पशू घोषित करावे : बारामती मुस्लिम समाजाची मागणी

प्रतिनिधी – बारामती मुस्लिम समाजाच्या वतीने दिनांक २५ मे रोजी प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) तसेच बारामती…

ByBymnewsmarathi May 25, 2026

बारामती तालुक्यात गोवंश कत्तलीचा पर्दाफाश; रक्तमिश्रित साहित्य जप्त

प्रतिनिधी. माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत गोवंश जनावरांच्या अवैध कत्तलीप्रकरणी तीन जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या…

ByBymnewsmarathi May 20, 2026