• Home
  • ताज्या बातम्या
  • श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालय निंबुत मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी…
Image

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालय निंबुत मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी…

प्रतिनिधी.
निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे मानद सचिव मा.श्री.मदनराव मोहनराव काकडे दे. यांच्या शुभहस्ते करण्यात आले त्यांनी आपल्या मनोगतांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा परिचय करून दिला.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ .दिपाली ननावरे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे समाजातील कार्य आणि भारतीय राज्यघटनेतील योगदानाविषयी माहिती सांगितली.
यावेळी विद्यालयातील इ. ८वी तील विद्यार्थ्यांनी कु.अक्सा तोफिक सय्यद या विद्यार्थिनीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा परिचय आपल्या मनोगतातून व्यक्त केला, तसेच आंबेडकरांचे बालपण शिक्षण आणि देशासाठी असणारे कार्य सांगितले
तसेच इ. ६वी तील राज विठ्ठल आठवले या विद्यार्थ्याने आंबेडकरांचे जीवन कार्य आणि समता बंधुता आणि स्वातंत्र्य या मूल्यांचा केलेला स्वीकार आपल्या मनोगत सांगितला. यावेळी विद्यार्थ्यांचे वही आणि पेन देऊन मानद सचिवांच्या शुभहस्ते कौतुक करण्यात आले. विद्यालयातील शिक्षक श्री.सूर्यवंशी सर यांनी आभार मानले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.सतीशभैय्या काकडे दे. उपाध्यक्षा सौ. सुप्रियाताई पाटील आणि ज्येष्ठ संचालक मा.श्री.भीमराव बनसोडे सर यांनी शुभेच्छा दिल्या.

Releated Posts

धक्कादायक पत्नीनेच रचला पतीच्या खुनाचा कट ?

प्रतिनिधी. कराड मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बायकोने नवऱ्याची 2 जणांना सुपारी देऊन चार चाकी ने धडकवून…

ByBymnewsmarathi Jun 8, 2026

एसटी महामंडळाने प्रवाशांच्या समस्या सोडविण्यावर भर द्यावा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बारामती प्रतिनिधी – बारामती आगारात नव्याने दाखल करण्यात झालेल्या १० ‘राजमाता जिजाऊ’ या अत्याधुनिक स्मार्ट बस सेवेचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 7, 2026

निरा – मोरगाव रस्त्यावर चौधरवाडी फाट्यावर भीषण अपघात; दोन बहिणींचा जागीच मृत्यू, भाऊ गंभीर जखमी

प्रतिनिधी. निरा–मोरगाव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाटा येथे शनिवारी (दि. ६) सायंकाळी साडेचार च्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात दोन…

ByBymnewsmarathi Jun 6, 2026

परवानगीच्या गोंधळानंतर CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांची सशर्त मंजुरी

प्रतिनिधी दिल्लीतील जंतरमंतर येथे आज होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टी अर्थात CJP च्या आंदोलनावरून देशभरात मोठी चर्चा रंगली आहे.…

ByBymnewsmarathi Jun 6, 2026