मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

हडपसरमधील सराईताच्या साताऱ्यात मुसक्या आवळल्या

mnewsmarathi 16 Jan 2023 1 मिनिट वाचन 9,053 वाचन

प्रतिनिधी

पुणे, ः हडपसरमध्ये दहशत माजविणाऱ्या सुजीत वर्मा टोळीतील सराईताच्या गुन्हे शाखेने साताऱ्यात मुसक्या आवळल्या.

मागिल काही महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. राजकिरण उर्फ ओमस्या गणेश भंडारी (वय २२, रा. गंगानगर, फुरसुंगी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट-६च्या पथकाने हडपसर भागातील कोयता गॅंगचा म्होरक्या बिट्या कुचेकर याच्यासह साथीदारांना नुकतीच अटक केली होती. तसेच दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. सराईत गुन्हेगार भंडारी नाझिरे (जि. सातारा) गावात असल्याची माहिती सूत्रांकडून पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला अटक केली. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल आणि पथकाने ही कारवाई केली.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi