Image

मरडगावात महिला रोजगार मेळावा

प्रतिनिधी

हदगाव तालुका मरडगाव येथे मानव विकास संरक्षण समितीच्या वतीने तालुका अध्यक्ष सौ, अनिता काळे पाटील यांच्या माध्यमातून व राष्ट्रीय अध्यक्ष श्री विजयजी कुराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महिला रोजगार मेळावा घेण्यात आला, मरडगाव व परिसरातील महिलांना गावातच रोजगार मिळाला पाहिजे या हेतूने मानव विकास संरक्षण समिती नवी दिल्ली,रजि,भारत सरकार या समितीचे हेड जनसंपर्क अधिकारी श्री बी, व्ही, शिंदे साहेब या कार्यक्रम साठी आवर्जून उपस्थित होते, त्यांनी महिलांना स्वयं रोजगार या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले,तसेच एखाद्या वस्तूचे मार्केटिंग कसे करावे या संबंधी माहिती दिली, तसेच मानव विकास संरक्षण समिती बद्दल सामाजिक कामाची माहिती दिली

हदगाव तालुका अध्यक्ष सौ, अनिता काळे पाटील यांनी प्रस्तावित केले, त्यावेळी त्यांनी सांगितले कि, मरडगावात महिलांचे दहा बचतगट स्थापन केले परंतु या महिलांना रोजगार नाही

म्हणून स्वयं रोजगार मिळाला पाहिजे महिलांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, प्रत्येक महिला ही आत्मनिर्भर झाली पाहिजे,मोलमजुरीच्या कमी पैशात कुटुंब चालवणे अवघड होऊन जाते म्हणून महिलांना स्थानिक गावात रोजगार किंवा जोडधंदा मिळाला पाहिजे या हेतूने हा रोजगार मेळावा घेतला आहे गावातील महिला सरपंच यांनी दीपप्रज्वलन करुन सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन केले,

यावेळी गावातील तीनशेहून अधिक महिला मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या, त्याचप्रमाणे पुरुष व युवकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती, हदगाव तालुका अध्यक्ष सौ, अनिता काळे पाटील यांची तालुका अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती झालेली आहे, सामाजिक काम करणारी संस्था म्हणून मानव विकास संरक्षण समितीचा महाराष्ट्र ,गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात नावलौकिक मिळवला आहे

मुंबई, व दिल्ली येथे संस्थेचे ऑफिस आहे तेथूनच संस्थेचे सर्व कामकाज चालते, आशा सामाजिक संस्थेचे तालुका अध्यक्ष पद सौ, अनिता काळे पाटील यांना मिळाले त्याबद्दल त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष विजयजी कुराडे साहेब व महाराष्ट्रचे हेड जनसंपर्क अधिकारी श्री भाऊसाहेब शिंदे साहेब यांचे आभार व्यक्त केले, समितीच्या माध्यमातून आपण गावातील महिलांच्या समस्या व महिला सबलीकरण यावर मोठ्या प्रमाणात काम करणार आहोत असेही अनिता काळे पाटील यांनी सांगितले, नांदेड जिल्हा अध्यक्ष विजयाताई काचावार यांच्या उपस्थितीत  मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हळदीकुंकू मिलन हा कार्यक्रम घेण्यात आला व त्यांनीही महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले, यावेळी तालुका अध्यक्ष सौ,अनिता काळे पाटील यांनी विजयाताई काचावार यांना साडी चोळी देऊन यथोचित सत्कार केला, हा मेळावा यशस्वी करण्यासाठी ज्या महिलांनी योगदान दिले त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले,

Releated Posts

रक्तदान करुन वाढदिवस साजरा व पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली

कोरोना काळात व जम्मु-काश्मिर येथे आयोजित सिंदूर महारक्तदान शिबिरात आरोग्यदुत श्री.कृष्णमुर्ती जगताप यांचा सक्रिय सहभाग बारामती – वैद्यकिय,सामाजिक,…

ByBymnewsmarathi Feb 14, 2026

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनतर्फे पत्रकार दिनाच्या पत्रकारांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा.

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकार बांधवांचा…

ByBymnewsmarathi Jan 6, 2026

बारामती बिबट्या संदर्भातील चुकीच्या बातमीबाबत स्पष्टीकरण व जाहीर माफी.

आमच्या ‘एम न्यूज मराठी’ (M News Marathi) या न्यूज पोर्टलवर काल, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी बारामती परिसरात…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

भीमाशंकर मंदिर ३ महिने बंद ठेवण्याबाबत प्रशासकीय चर्चा; लवकरच होणार अंतिम निर्णय

प्रतिनिधी बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २८८.१७ कोटींचा विकास…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025