प्रतिनिधी
सोमेश्वर नगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालया मध्ये इयत्ता बारावी कला, वाणिज्य, विज्ञान व व्यवसाय अभ्यासक्रम या वर्गातील विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे होते यावेळी संस्थेचे सहसचिव सतीश लकडे, व्यवस्थापन समिती सदस्या सौ. सुजाता भोईटे, उपप्राचार्य जगताप आर. एस, पर्यवेक्षिका सणस मॅडम, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी महाविद्यालयात आल्यानंतर शिस्त असणे गरजेचे आहे त्याचबरोबर मुलांना भविष्यात आपल्या करिअरमध्ये कोणत्या दिशेने जायचे आहे याची समज असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सर्व शाखांमध्ये करिअरची समान संधी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले व बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या.
कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जगताप आर. एस. सरांनी बारावीच्या बोर्ड परीक्षा व प्रात्यक्षिक परीक्षा विषयी मार्गदर्शन केले व बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी इयत्ता बारावी वर्गातील नेहा पिसाळ, अमृता काकडे, भाविका होळकर, ज्ञानेश्वरी बिबे, ज्ञानेश्वरी गायकवाड, शिवानी जगताप, अक्षदा अडसूळ, पलक निंबाळकर, सिमरन शेख, नंदिनी थोरात, सस्ते रूपाली, प्रेम कापरे व महाविद्यालयाची खेळाडू आकांक्षा सावंत हिने विभागीय स्पर्धेतून फोनच्या माध्यमातून आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून कार्यक्रमांमध्ये रंगत वाढवली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अहिल्या ठोंबरे, अमृता ननवरे, सिद्धी गोरे, आसिया शेख, श्रुती गायकवाड व आभार राजगौरी घाडगे हिने मानले.