प्रतिनिधी
पोलीस डिपार्टमेंट ही लोकांसाठी अनेक प्रकारची सेवा देत असतात अनेक मोबाईल लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारे गहाळ होत असतात.
लोकांचे हे हरवलेले मोबाईल चोरी गेलेले मोबाईल शोधून देण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक यांनी अग्रक्रम दिलेला आहे. सन 2022 मध्ये जे मोबाईल चोरी गेलेले आहेत ते वेळोवेळी परत तांत्रिक तपास करून शोधण्याबाबत सर्व पोलीस स्टेशनला आदेश दिलेले आहेत व त्याबाबत सायबर सेल पुणे ग्रामीण यांची मदत घेण्याबाबत आदेशित केलेले आहे. जे मोबाईल ज्या ज्या ठिकाणी चालू आहेत त्याबाबतची माहिती सर्व पोलीस स्टेशनला पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत कळवली जाते. अनेक मोबाईल सध्या कुठे कार्यरत आहेत हे पोलीस स्टेशनला कळते परंतु पोलीस खात्यात पोलीस स्टेशनला इतर कामे असल्यामुळे जर मोबाईल परराज्यात मिळून आला तर प्रवास लांबचा असल्याने त्या ठिकाणी पोलीस पोहोचत नाहीत त्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक यांनी काहीच तपास न करण्यापेक्षा सदरचा मोबाईल ज्यांच्या ताब्यात आहे त्यांना सरळ फोन करा कदाचित ते चोर नसतीलही त्यांना कोणीतरी तो मोबाईल दिला असेल आणि त्यांना जर सांगितलं की याबाबत पुणे ग्रामीण या ठिकाणी तक्रार दाखल आहे तर कदाचित ते लोक सदरचा मोबाईल परत पाठवून देऊ शकतात. याच प्रकारे बारामती येथील न्यायालयात काम करणारे आकाश संजय खंदारे यांचा मोबाईल 14 नोव्हेंबर 2022 रोजी झाला होता आणि सदरचा मोबाईल तामिळनाडू मध्ये ऍक्टिव्हेट झाला कामाच्या व्यस्ततेमुळे तामिळनाडूला जाणे शक्य नसल्याने माननीय पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आयडिया प्रमाणे सरळ त्या मोबाईल धारकाला फोन केला व त्याला सांगितले की या मोबाईल बाबत तक्रार बारामती शहर पोलीस स्टेशनला आहे आपण तो मोबाईल तात्काळ पाठवून द्यावा अन्यथा आपल्यावर कारवाई केली जाईल असे सांगितल्याने सदर इसमाने तो फोन दुसरा कोणाकडून तरी विकत घेतलेला होता त्याने सरळ कुरिअर मध्ये जाऊन सदरचा फोन बारामती शहर पोलीस स्टेशनच्या पत्त्यावर पाठवून दिला व आज सदरचा मोबाईल माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी तो तक्रारदाराला दिला तक्रारदाराला अतिशय आनंद झाला कारण त्याचा मोबाईल 45 हजार रुपये किमतीचा होता त्याने संपूर्ण पोलीस दलाचे आभार मानले सदरची कामगिरी सायबर पोलीस ठाणे चे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ दशरथ इंगवले यांनी केलेली आहे