मुख्य मजकुरावर जा
Tuesday, 15 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 26 January 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

शेतजमीनीच्या वादावरून आपंग व्यक्तीस मारहाण वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
January 26, 2023 1 मिनिट वाचन 8,518 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी – फिरोज भालदार

दि. 8/1/2023 रोजी सकाळी 11.00 वा सुमारास मौजे करंजे देऊळवाडी ता. बारामती जि. पुणे येथे फिर्यादी चंद्रकांत नवनाथ होळकर व फिर्यादी यांचा मुलगा किशोर हे दोघे करंजे देउळगाव हद्दीतील जमीन गट नंबर 27/1 मधील शेतात कल्टी वेटर मारत असताना आरोपी लहू पोपट होळकर रा. करंजे ता. बारामती जि. पुणे ही व्यक्ती फिर्यादी चंद्रकांत होळकर यांच्या शेतात अनधिकृतपणे फिर्यादीचे संमतीशिवाय प्रवेश करून फिर्यादी चंद्रकांत होळकर यांना तुमचे विहिरीचे काम चालू आहे

त्यामध्ये मला पाण्याचा हिस्सा पाहिजे व तुमचे गटाचे पूर्व बाजूस असलेले उत्तर दक्षिण बाजूस असलेला 12 फुट रस्ता लेखी कागदपत्रे दस्ताने करून द्या असे म्हणत असताना फिर्यादी चंद्रकांत होळकर यांनी त्यास असे कसे होऊ शकते गटात पुर्वीपार पासून रस्ता आहे त्या रस्त्याने जाणे येणे करिता कोणीही आतापर्यंत अडथळा केला नाही व करणार ही नाही हा रस्ता नकाशामध्ये देखील आहे .त्यामुळे मी रस्ता लिहून देण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हणल्याच्या कारणावरून तसेच फिर्यादी हे अपंग असल्याचे माहित असतानाही देखील आरोपी लहू होळकर याना कुठल्याच प्रश्नाला सकारात्मक उत्तर न भेटल्याने त्याने हा रग मनात धरुन फिर्यादी यांला चिडुन जाऊन दमदाटी करून फिर्यादीचा मुलगा किशोर यास हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादी चंद्रकांत होळकर यांच्या शेततळ्यात ढकलून देऊन दुखापत केली. यावरुन करंजे पोलीस दूरक्षेत्र येथील मजकूरावरुन वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये भादवि कलम 447,323,504,506 व अपंग व्यक्ति आधिकार अधिनियम 2016 चे कलम 92 (ब ) नुसार आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास स. पो.नि सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. स.ई शेलार हे करत आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख