बा.सा. काकडे विद्यालय निंबुत येथे प्रजासत्ताक दिन संपन्न.

माझा जिल्हा

संपादक मधुकर बनसोडे.

 निंबुत येथील बा.सा. काकडे विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी श्री. सतीशराव काकडे यांनी बा.सा काकडे विद्यालयाची सुरुवात करताना जे स्वप्न उराशी बाळगले होते ते स्वप्न उदयास आल्याची भावना श्री सतीश काकडे यांनी यावेळी व्यक्त केली.

 शाळा स्थापनेपासून शाळेचा चढता शैक्षणिक आलेख याबद्दल मुख्याध्यापिका सौ दिपाली ननवरे यांनी सह कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

 राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन अंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बा.सा. काकडे विद्यालयातील विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी सतीश काकडे, भीमराव बनसोडे, सचिव मदन काकडे, निंबुत गावचे उपसरपंच अमरदीप काकडे, संभाजी काकडे, नंदकुमार काकडे, पशुवैद्यकीय अधिकारी धनंजय पोळ, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळे बाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही माझ्या गावातील मुलांना चांगले व उच्च दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे असे देखील श्री सतीश काकडे यांनी बोलताना सांगितले.