प्रतिनिधी
शालेय मुलांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून निंबुत ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्या विद्याताई काकडे,मा.ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय लकडे, विजय लकडे ,विराज जगताप सोमेश्वर सहकारी कारखान्याचे शेतकी अधिकारी संदीप लोखंडे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश लकडे,
युवा कार्यकर्ते महेश लकडे सत्तारभाई सय्यद,रफिक सय्यद ,अनुप लकडे, आबू लकडे,गणेश लकडे, बारामती पंचायत समितीचे विषय तज्ञ सुदर्शन धायगुडे, बाळासाहेब खोपडे संतोष हाके व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले, शालेय मुलांना धैर्यशील काकडे व विराज जगताप यांच्या तर्फे चषक देण्यात आले. यावेळी शाळेला मोफत चार गुंठे जागेचे बक्षीस पत्र केल्याबद्दल महेश लकडे व शाळा बांधकाम होईपर्यंत स्वतःच्या नवीन खोल्या वर्गासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल दत्तात्रय लकडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विद्याताई काकडे संदीप लोखंडे व सुदर्शन धायगुडे यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शालेय विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सर्वांचे आभार शाळेचे उपशिक्षिका विद्या भोसले यांनी मानले.