परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
*महाराष्ट्रातील पाचही ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र कॉरिडॉर घोषित करावेत यासाठी स्वामीजी आग्रही*
पीठाधीश्वर श्रीराम शक्तीपीठ संस्थान राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री १००८ महामण्डलेश्वर स्वामी सोमेश्वरानन्द सरस्वतीजी महाराज दि. ३० जानेवारी रोजी दुपारी चार वाजता प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेणार आहेत. महाराष्ट्रातील पाचही ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र कॉरिडॉर घोषित करावेत यासाठी स्वामीजी आग्रही आहेत. या अनुषंगाने स्वामीजी औद्योगिक वसाहतीत दुपारी पाच वाजता परळी वैजनाथच्या रहिवाशांसोबत संवाद साधणार आहेत. त्यानंतर स्वामीजी पत्रकारांना संबोधित करतील.
*गुरुदेवांचा संक्षिप्त परिचय*
पीठाधीश्वर श्रीराम शक्तीपीठ संस्थान राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री १००८ महामण्डलेश्वर स्वामी सोमेश्वरानन्द सरस्वतीजी महाराज
(प॔चायती अखाडा श्री निरंजनी)
श्रीक्षेत्र चाकोरे (बेझे) त्र्यंबकेश्वर नाशिक..!
लहानपणापासूनच स्वामीजींच्या विचारांचा लोकांवर प्रभाव असायचा. स्वामीजींनी लहानपणापासूनच भक्तीचा मार्ग स्वीकारला होता. स्वामीजी गेल्या ३५ वर्षांपासून सातत्याने सामाजिक कार्य करत आहेत. स्वामीजींचे सेवाकार्य संपूर्ण मानवजातीला प्रेरणादायी आहे. नाशिक जिल्हा व परिसरातील गावांमध्ये सत्संगाच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत. या सत्संगाच्या माध्यमातुन हजारो लोकांनी दारूपासून मुक्ती मिळवली, लहान मुले व तरुणांना ध्यान, योगासने, प्राणायामाचे महत्त्व सांगून जीवनात यश मिळविण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात येते, वृद्ध पालकांसाठी वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात येते.
देशातील आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गावोगावी आणि आदिवासी भागात जाऊन जनजागृती आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम स्वामीजी करतात. अतिदुर्गम भागात जाऊन कुपोषणमुक्तीसाठी मोठ्या प्रमाणावर शिबिरे उभारून, लहान मुलांना आणि कुपोषित मातांना प्रथिनेयुक्त औषधे व आहार देऊन त्यांना कुपोषणमुक्त करण्यासाठी अविरत काम सुरू आहे. शहर आणि विकसित समाजातील नागरिकांना गाय, गंगा, गौरी यांचे महत्त्व सांगितले. माता गाईला संपूर्ण समाजात सुरक्षित आणि सन्मान मिळावा यासाठी गोशाळांची स्थापना करण्यात आली.
गौरी म्हणजे आपली आई, बहीण, पत्नी, मुलगी जी आपल्याला स्त्री रूपात जन्म देते, आपले पालनपोषण करते, आपल्याला संस्कार शिकवते. धर्मग्रंथात ज्यांचे दुर्गा, लक्ष्मी, काली असे वर्णन केले आहे त्यांचा सन्मान करण्यासाठी सत्संगाच्या माध्यमातून लाखो लोकांना महिलांचे महत्त्व सांगून स्त्रीभ्रृण हत्या रोखले तसेच लहान मुलींवर अन्याय, बलात्कार, शोषणाविरुद्ध आवाज उठवला. आपले आद्य गुरू असलेल्या पालकांची सेवा करण्याचे महत्त्व सांगून ही सेवा हाच पुण्यप्राप्तीचा मार्ग आहे, असा संदेश दिला.
स्वामीजींचे कार्य पाहून सन २०१२ मध्ये आनंद अखाड्याचे अध्यक्ष महंत स्वामी सागरानंद सरस्वती यांच्या हस्ते आणि ज्योतिर्मठ शंकराचार्य जगतगुरू वासुदेवानंद सरस्वतीजी महाराज (बद्रीकाश्रम, बद्रीनाथ ) च्या प्रमुख उपस्थितीत स्वामीजींना धर्माचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले. २०१५ मध्ये, प्रदूषण निर्मूलन कार्यासाठी राष्ट्रीय नागरी आणि पर्यावरण संरक्षण आंतरराष्ट्रीय संस्था ( दिल्ली ) या संस्थेने स्वामीजींना राष्ट्रभूषण पुरस्काराने सन्मानित केले. स्वामीजींचे अध्यात्मिक कार्य आणि प्रचाराच्या दृष्टीने २०१५ मध्ये कुंभपर्वावर पंचायती अखाडा श्री निरंजनी महंत श्री नरेंद्रगिरीजी महाराज
(अखिल भारतीय अखाडा परिषद अध्यक्ष प्रयागराज) आणि निरंजनी पंचपरमेश्वर यांनी स्वामीजींचा महामण्डलेश्वर पट्टा अभिषेक करून सन्मान केला. स्वामीजी समाजात समता, बंधुता आणि एकता आणण्याचे काम करतात.
भारतीय दलित साहित्य अकादमी (दिल्ली) ने २०१७ मध्ये स्वामीजींना बाबू जगजीवनराम समता राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले. भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत, स्वामीजींची त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली.तसेच त्र्यंबकेश्वर येथील पुरोहीत संघाने स्वामीजींना राष्ट्रसंत ही उपाधी १५ जानेवारी २०२२ रोजी प्रदान केली आहे .न्युज १८ लोकमत या चॅनेलनी स्वामीजींना नाशिक सन्मान २०२२ देऊन त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला आहे.
स्वामीजींचे प्राथमिक शिक्षण हे परळी तालुक्यात झालेले असुन ते आपले भूमीपुत्र आहेत. स्वामीजी महाराष्ट्रातील ज्योतीर्लींग तिर्थक्षेत्राचा विकास व्हावा यासाठी आग्रही आहेत त्र्यंबकेश्वर, परळी वैजनाथ, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ व भीमाशंकर हे ज्योतीर्लींग कॉरीडॉर व्हावे यासाठी केंद्र शासनाच्या स्तरावर स्वामीजी पाठ पुरावा करत आहेत . त्र्यंबकेश्वर विकास आराखड्यात स्थानिनागरीकांची बाजु स्वामीजींनी मोठ्या प्रभावाने मांडली असुन स्थानिकांचे हितसंबंध ध्यानात ठेऊन हा विकास आराखडा बनविण्यात येत आहे याचे संपुर्ण श्रेय स्थानिक नागरिक स्वामीजींना देतात.
केंद्र शासनाने नव्याने तयार केलेल्या ज्योतिर्लिंग विकास आराखड्यात दुर्दैवाने परळी वैजनाथ हे नाव घेता हेतु पुरस्पर इतर ठिकाणाचे नाव घालण्यात आल्याचे लक्षात येताच त्यांनी या बाबत केंद्र सरकार कडे तीव्र आक्षेप नोंदवला असुन परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगचा समावेश विकास आराखड्यात करण्यासाठी स्वामीजी प्रयत्नशील आहेत.या साठी गुरुदेव परळी वैजनाथ येथे येऊन हा विषय धार्मिक व सामाजिक पातळीवर नागरीकांना समजवुन सांगण्यासाठी व श्री क्षेत्र परळीचे धार्मिक महत्व कमी होऊ नये यासाठी जनजागृती करण्यासाठी परळी येथे सोमवार दि. ३० जानेवारी २०२३ रोजी येत आहेत.
स्वामीजी दुपारी चार वाजता श्री क्षेत्र वैजनाथ धाम परळी येथे दर्शनासाठी येतील तदनंतर स्वामीजी परळी वैजनाथ येथील औद्योगिक वसाहत सभागृहात मान्यवरांच्या या संबंधाने भेट घेतील व पत्रकारांना संबोधित करतील.