सोमेश्वर करंडक 2023 मध्ये हे संघ ठरले विजय

माझा जिल्हा

प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जाणता राजा मा. श्री. पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भरवण्यात आलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये विजेता ठरला तनवीर शेखचा माळेगाव क्रिकेट क्लब. बारामती तालुक्यातील या अग्रमानांकित स्पर्धेमध्ये वाई, फलटण, खंडाळा, पुरंदर, बारामती, दौंड, कोरेगाव, शिरूर या तालुक्यामधून आलेल्या संघामधून झालेल्या अतिशय चुरशीच्या लढतीमध्ये माळेगाव क्रिकेट क्लब या संघाने बाजी मारली. उपविजेता संघ एस आर पी एफ दौंड या पोलिस संघाने दुसरा क्रमांक पटकावला.

तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला उंडवडीचा क्रिकेट क्लब, गतवर्षीप्रमाणे यावर्षीही अतिशय चुरशीच्या लढतीमध्ये पुणे आणि बारामती असे बलाढ्य संघ असताना सर्वांना धूळ चारत जितू भैया सकुंडे क्रिकेट क्लब सेमीफायनल मध्ये पोहोचला होता. या संघाने चतुर्थ क्रमांक पटकाविला. प्रथम क्रमांकाचे बक्षीस व चषक नवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक मा. श्री. संग्रामभाऊ सोरटे आणि करंजेपुल पोलीस चौकीचे पीएसआय मा. श्री. योगेशजी शेलार साहेब यांच्या हस्ते देण्यात आले. तृतीय क्रमांकाचे बक्षीस व चषक युवा नेते मा श्री गौतम भैया काकडे देशमुख यांच्या वतीने देण्यात आले. चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस उंडवडीच्या क्रिकेट क्लब ला शेंडकरवाडीचे उद्योजक भोसरी येथील रेणुका इंडस्ट्रिजचे मालक मा. श्री. चांगदेव धुर्वे साहेब यांच्या हस्ते देण्यात आले. चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस बारामतीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेबांची शिवसेना यांच्यामार्फत देण्यात आले. या स्पर्धेसाठी परिसरातील बहुतेक व्यवसायिकांनी आपापल्या व्यावसायाच्या जाहिरातीचे बोर्ड संपूर्ण मैदानावर लावले होते. यावर्षी प्रथमच ही स्पर्धा युट्युब लाईव्ह वर दाखवण्यात आलेली होती. परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन श्री. पुरुषोत्तमदादा जगताप, माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक मा. श्री. राजवर्धनदादा शिंदे, पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती मा. श्री. प्रमोदकाका काकडेदेशमुख, पश्चिम महाराष्ट्राचे आरपीआयचे अध्यक्ष मा. श्री. योगेशदादा अहिवळे अशा विविध लोकांनी या स्पर्धेसाठी उपस्थिती लावून साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

ही स्पर्धा अतिशय नियोजनबद्ध आणि शिस्तीने यशस्वी झाली.

या स्पर्धेमुळे आपल्या परिसरातील क्रिकेटपटूंना एक व्यासपीठ निर्माण झाले असून भविष्यात या परिसरामधून चांगले व्यवसायिक क्रिकेटपटू तयार व्हावेत, सात तालुक्यामधून आलेल्या क्रिकेटपटूमुळे या परिसरातील व्यवसायिकांना नक्कीच फायदा होतो त्यामुळे पुढील काळामध्ये अनेक बदल करून ही स्पर्धा आधुनिक पद्धतीने भरवण्याचा प्रयत्न राहील.

सोमेश्वर करंडक हे नाव दोन जिल्ह्यांमध्ये अतिशय गाजलेले असून भावी काळात यापेक्षाही सुंदर नियोजन करण्याचा आपला प्रयत्न राहील. यावेळी ही स्पर्धा युट्युब माध्यमातून प्रदर्शित केल्यामुळे जगभरातील 192 देशांमध्ये *सोमेश्वर करंडक* याचा प्रसार झालेला आहे. असे या स्पर्धेचे आयोजक मा श्री बुवासाहेब हुंबरे यांनी सांगितले.

स्पर्धेचा मानकरी ठरला तो दौंड पोलिस संघाचा किरण भगीरथ. उत्कृष्ट फलंदाज ठरला तो शिरष्णे संघाचा बारामतीचा हार्दिक पांड्या संतोष लष्कर. उत्कृष्ट गोलंदाज चा मानकरी ठरला माळेगावचा तन्वीर शेख. उडी मारुन झेल टिपून प्रेक्षकांची मने जिंकणारा चौधरवाडी चा गोरख चौधरी याने उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब मिळवला. यात पट्ट्याचा युट्युब वर झेल पाहून पुण्यातील व्यवसायिक मुकुंद चौधरी यांनी रोख बक्षीस पाठवले.

या स्पर्धेचे संपूर्ण नियोजन बुवासाहेब हुंबरे मित्र परिवार यांचेमार्फत श्री. किरण शेंडकर, श्री. भाऊसाहेब हुंबरे, श्री. पापा मुलांनी, श्री. राजेश भांडवलकर आणि त्यांचं सहकारी यांनी अहोरात्र कष्ट करून ही स्पर्धा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली.