बारामती ! वडगाव निंबाळकर येथील विनायक भिसे यांस उत्कृष्ट समुपदेशिक पुरस्कार प्रदान . 

माझा जिल्हा

प्रतिनिधी- फिरोज भालदार

   माईट गुरु फाउंडेशनचा प्रथम वर्धापन दिन दि. 26 जानेवारी 2023 रोजी जालना येथे साजरा करण्यात आला .यामध्ये प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर आघाम यांनी केले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रशांत पळणीटकर. डॉ. आनंद अग्रवाल, डॉ. नितीन पवार डॉ.नितीन शहा, डॉ. प्रकाश आंबेडकर ,डॉ. सुरज सेठीया ,डॉ. भरत निमरोट,डॉ. शांताराम रायपुरे ,डॉ. प्रबोधन कळंब, डॉ. सुजाता देवरे, प्रा. स्मिता निर्मल यांची प्रमुख उपस्थिती होती.

    तसेच कार्यक्रमास संस्थेचे सचिव अमोल आघाम उपाध्यक्ष सौ. सुनीता आघाम आणि संस्थेचे सदस्य लहू थोरात आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये ताण-तणाव व्यवस्थापन या विषयावर डॉ. आनंद अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले, तर मानसशास्त्र म्हणजे काय या विषयावर डॉ. भरत निमरोट यांनी उपस्थितांना मार्मिक शब्दात उदाहरणे दिले आणि अनुभव सांगितले.

   यामध्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावचे विनायक भिसे यांना उत्कृष्ट समुपदेशक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती श्रीसुंदर यांनी तर मान्यवर उपस्थितांचे आभार प्रतीक्षा ठाकरे यांनी मानले .