• Home
  • माझा जिल्हा
  • नाथ शिक्षण संस्था कार्यालय येथे प्रा.डॉ.पी.एल.कराड व प्राचार्य अतुल दुबे यांचा सत्कार
Image

नाथ शिक्षण संस्था कार्यालय येथे प्रा.डॉ.पी.एल.कराड व प्राचार्य अतुल दुबे यांचा सत्कार

प्रतिनिधी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- वैद्यनाथ कॉलेज कर्मचारी पतसंस्थेच्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब विकास पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाल्याबद्दल पॅनल प्रमुख प्रा डॉ पी एल कराड यांचा व यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयचे प्राचार्य अतुल दुबे सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तने नाथ शिक्षण संस्था कार्यालय येथे सत्कार करण्यात आला.

         नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी सामाजिक न्याय मंत्री तथा परळी विधानसभा मतदारसंघाचे आ.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहसचिव प्रदिप खाडे यांच्या वतीने जवाहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेज कर्मचारी पतसंस्थेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब विकास पॅनलचे सर्वच्या सर्व 11 उमेदवार विजयी झाले आहेत. त्याबद्दल पॅनल प्रमुख प्रा डॉ पी एल कराड व यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयचे प्राचार्य अतुल दुबे सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोमवार दि.०६ फेब्रुवारी रोजी नाथ शिक्षण संस्थेच्या कार्यालयात शाल, श्रीफळ,फेटा बांधून, पुष्पगुछ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे, पाटलोबा मुंडे, माजी सरपंच हरिष नागरगोजे, नवनाथ फड, फड सर उपस्थित होते.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026