• Home
  • सामाजिक
  • निवडणूक कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जाऊन मतदार जागृती
Image

निवडणूक कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जाऊन मतदार जागृती

प्रतिनिधी

पुणे, दि.६: भारत निवडणूक आयोगाने मतदार सुविधाकेंद्रीत निवडणूकांवर भर देण्यात येत आहे. मतदानाची टक्केवारी वाढण्याच्यादृष्टीने २०५- चिंचवड विधानसभा मतदार संघात निवडणूक विषयक अधिकारी कर्मचारी घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिक आदींसाठी मतदानासाठी उपलब्ध सुविधांची माहिती देत आहेत.

सर्व स्तरातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाऊन राष्ट्रीय कार्यात सहभाग घ्यावा यासाठी निवडणूक आयोगामार्फत प्रयत्न सुरू आहेत. त्याअंतर्गत २०५- चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीदरम्यान मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी ८० वर्षेपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांच्या तसेच दिव्यांग मतदारांच्या घरी जाऊन निवडणूक अधिकारी जागृती करत आहेत.

८० वर्षे पेक्षा जास्त वय असणाऱ्या तसेच दिव्यांग मतदारांसाठी निवडणूक आयोगाने प्रथमच घरामधून टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी अशा मतदारांकडून मतदार नोंदणी करणारे अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष अशा मतदारांच्या घरी जाऊन इच्छुकांकडून ‘नमुना १२ डी’ नमुना अर्ज भरुन घेत आहेत.

त्याशिवाय दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी व्हीलचेअर, अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीचा समावेश असलेले मतदान यंत्र (ईव्हीएम), घरापासून मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्याची सुविधा आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात, आदीसंबंधाने चिंचवड विधानसभा मतदार संघात प्रबोधन करण्यात आल्याची माहिती समन्वयक अधिकारी अजय पवार यांनी दिली आहे.

Releated Posts

रक्तदान करुन वाढदिवस साजरा व पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली

कोरोना काळात व जम्मु-काश्मिर येथे आयोजित सिंदूर महारक्तदान शिबिरात आरोग्यदुत श्री.कृष्णमुर्ती जगताप यांचा सक्रिय सहभाग बारामती – वैद्यकिय,सामाजिक,…

ByBymnewsmarathi Feb 14, 2026

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनतर्फे पत्रकार दिनाच्या पत्रकारांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा.

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकार बांधवांचा…

ByBymnewsmarathi Jan 6, 2026

बारामती बिबट्या संदर्भातील चुकीच्या बातमीबाबत स्पष्टीकरण व जाहीर माफी.

आमच्या ‘एम न्यूज मराठी’ (M News Marathi) या न्यूज पोर्टलवर काल, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी बारामती परिसरात…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

भीमाशंकर मंदिर ३ महिने बंद ठेवण्याबाबत प्रशासकीय चर्चा; लवकरच होणार अंतिम निर्णय

प्रतिनिधी बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २८८.१७ कोटींचा विकास…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025