संपादक- मधुकर बनसोडे
बारामती -: आपल्या भारत देशामध्ये असंख्य डिजिटल मीडियाचे पत्रकार आहेत. माहिती व प्रसारण मंडळाने 2021 च्या गाईडलाईनुसार हे डिजिटल मीडियाचे पत्रकार वेब पोर्टल इंटरनेटच्या माध्यमातून पत्रकारिता करत आहेत. परंतु खऱ्या अर्थाने हे डिजिटल मीडियाचे पत्रकार एकजुटीने व एक संघ आहेत का?
डिजिटल मीडियाचे पत्रकार हे नेहमी नागरिकांचे प्रश्न घेऊन आपल्या लेखणीतून न्याय मिळवून देण्याचे काम करीत असतात. परंतु हा न्याय मिळवून देत असताना. कदाचित त्यांच्या स्वतःवरती होणारा अन्याय ते विसरत चालले आहेत . वास्तविक पाहता डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना कुठल्याही प्रकारचे योजना किंवा मानधन नाही, उदाहरण द्यायचं तर एखाद्या राजकीय व्यक्तीचा वाढदिवस असो किंवा कार्यक्रम असो त्याची बातमी लावण्यासाठी त्या माझ्या पत्रकार बंधूला अनेक वेळा कॉल केला जातो. आणि ती बातमी लावल्यानंतर त्याने त्या नेत्याला विचारले की तुमच्या वाढदिवसाची जाहिरात आमच्या चैनल ला लावतोय तर ते जाहिरात देण्यास टाळाटाळ करतात. आज पर्यंत माझ्या डिजिटल मीडियाच्या पत्रकारांसाठी विमा योजना नाही, तसेच मुलं शाळेत शिकत असतील त्यांच्यासाठी कुठलीही सवलत नाही. कुठलेही अनुदानात्मक कर्ज योजना नाही. डिजिटल मीडियाचा पत्रकार बांधव देखील हा संविधानातला चौथा स्तंभ आणि समाजातला एक घटक आहे. एक ना अनेक संकटांना त्याला सामोरे जावे लागते. तर ह्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी प्रशासनाला आपण एकत्र येऊन न्याय मागणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण एकमेकांच्या मनातील द्वेष हेवेदावे बाजूला ठेवून आपण सर्व पत्रकार बंधूनी एकत्र येण्याची गरज आहे. तसेच महाराष्ट्रातून नव्हे तर आपल्या पुणे जिल्ह्यातून आपल्या बारामती तालुक्यात मोठा लढा उभारण्याची वेळ आलेली आहे तरी सर्व डिजिटल मीडियाच्या पत्रकार बांधवांना मी आव्हान करतो की आपण सर्वांनी एकत्र येऊन सर्व अर्थाने आपल्या सर्वांवर होणारा अन्याय जो की दिसत नाही. त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एकजूट झाले पाहिजे. काळ हा वाईट आहे आपण सर्वजण एकत्र आलो नाही तर प्रत्येकाला एकट्याला अडचणीत आणून संपवण्याचे कटकारस्थान जे चालू आहे याला आळा बसला पाहिजे.
त्यासाठी सर्व डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना विनंती करतो आपण एकजुटीने न्याय हक्कासाठी लढा उभारूया पत्रकार बंधुंनो वेळेत जागे व्हा आणि आपल्या बंधूंना साथ द्या आपल्या पत्रकार बांधवांवरचे होणारे हल्ले यासाठी आवाज उठवा आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ एकीने बळकट करा.
आपण एकत्रित आलो नाही तर आपल्या पत्रकार बांधवांवरती हल्ल्यांचे प्रमाण हे तीव्र झाल्याशिवाय राहणार नाही व खोटा गुन्हा दाखल करण्यास सुद्धा मागे पुढे बघणार नाहीत म्हणुन पत्रकार बंधूंनो याचा थोडासा विचार करा व एकजूट व्हा