• Home
  • राजकीय
  • सोमेश्वर कारखान्यापासुन कॉलेज वेगळे करणारा खरा चोर पुरुषोत्तम जगतापच कृती समितीचे अध्यक्ष श्री सतिश काकडे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट……
Image

सोमेश्वर कारखान्यापासुन कॉलेज वेगळे करणारा खरा चोर पुरुषोत्तम जगतापच कृती समितीचे अध्यक्ष श्री सतिश काकडे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट……

प्रतिनिधी

मागील काही दिवसापुर्वी वर्तमान पत्रामधुन सोमेश्वरचे चेअरमन श्री पुरूषोत्तम जगताप यांनी शेतकरी कृती समितीची नाहक बदनामी करून कोणतीही माहिती नसताना कारखान्यापासुन कॉलेज कृती समितीने चोरल्याचा आरोप केला की जो धादांत खोटा असून केवळ स्वत:ला चेअरमन पदाची पुढील काही वर्षे वाढवून मिळण्यासाठी अजितदादा पवार यांना खुश करण्यासाठी, चालु वर्षीचे तोडणी वाहतुक यंत्रणेत आलेले अपयश झाकण्यासाठी तसेच कृती समितीने मागणी केलेल्या शेअर्स कपाती, जळीत उस ५० रू. कपात भरपाई बाबत, तोडणी वाहतुक यंत्रणेवर नियंत्रण न राहिल्याने तोडणी मजुरांकडुन सभासदांना मोठ्या प्रमाणावर पैशांची मागणी सुरू आहे त्याबाबत, शेअर्स प्रमाणे तात्काळ साखर वाटप सुरू करणे बाबत. तसेच शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिक्षक व शिक्षकेत्तरांच्या पगारातुन केलेल्या वसुलीचा गोंधळ या सर्व विषयांची उत्तरे चेअरमन यांच्याकडे नसल्यामुळेच याबाबत कोणताही खुलासा त्यांना करता आला नाही. तसेच स्वतःच्या गावात, मुरूम, वाघळवाडी, गडदरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवामुळे राजकिय व्दोषापोटी मु.सा.काकडे कॉलेज चोरल्याचा बिनबुडाचा व पोरकटपणाचा आरोप पुरूषोत्तम जगताप यांनी केला आहे.

वास्तविक मु.सा. काकडे कॉलेज विषयीची सदर केस हायकोर्टात प्रलंबित असल्याने मला यावर कुठलीही प्रतिक्रीया देणे उचीत वाटत नव्हते. तसेच काही दिवस माझी तब्येत ठिक नसल्याने मला यावर खुलासा करता आला नाही. तरी यावरील सर्व खुलासा मी टप्याटप्याने मांडणार आहे. कारण गेली वीस वर्ष सभासदांनी कृती समितीवर विश्वास दाखविल्यामुळे मी कृती समितीच्या माध्यमातुन सभासदांच्या न्याय हक्कांसाठी लढा देत आलेलो असून वेळप्रसंगी मी व कृती समितीच्या सदस्यांनी ६ ते ८ दिवसांचा तुरूंगवासही भोगला आहे हे सर्व सभासदांना माहित असेलच व यापुढेही सभासदांच्या न्याय हक्कांसाठी हा लढा कायम सुरू राहिल. तसेच माझा मुलगा जरी कारखान्याचा संचालक असला तरी शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शेतकरी कृती समितीच्या माध्यमातुन चुकीच्या गोष्टीसाठी कायम विरोध केला जाईल, हीच भुमिका मी ३०/९/२०२२ च्या वार्षिक सर्व साधारण सभेत मांडलेली आहे.

पुरूषोत्तम जगताप यांनी केलेल्या बिनबुडाच्या व पोरकटपणाच्या आरोपांवर सभासदांना खुलासा करणे माझे कर्तव्यच आहे. आदरणिय कै.बाबालालजी काकडे यांच्या निधनानंतर मी खऱ्या अर्थाने कॉलेजमध्ये लक्ष घालुन कॉलेजचा कायापालट केला आहे तो आज सर्व सभासदांना दिसत आहे. हा कायापालट करीत असताना कॉलेजची आर्थिक क्षमता मोठी नसताना, कॉलेजच्या मागे कोणत्याही इतर संस्थेची ताकद नसताना व माझ्याकडे कुठलीही राजकिय ताकद नसतानाही मी कॉलेजचा कायापालट केला आहे. कारखाना व मु.सा. काकडे कॉलेज यांचा कॉलेज संबंधीचा वाद १९९२ पासुन सुरू झाला. त्यामध्ये माझा कोणताही संबंध व सहभाग नव्हता कारण त्यावेळी मी कॉलेजच्या कोणत्याही पदावर अथवा कमिटीवर नव्हतो. तसेच शेतकरी कृती समितीची स्थापनाच २००३ सालची आहे असे असतानाही पुरूषोत्तम जगताप हे जाणीव पुर्वक माझी व कृती समितीची बदनामी करीत आहेत. मला कॉलेजच्या केसबाबत मा. हायकोर्ट यांची नोटीस आल्यानंतर मी कारखाना व कॉलेज संबंधीची कागदपत्रे पाहिली असता व्यक्तीशः मलाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्या कागदपत्रांवरून असे दिसुन आले की मु.सा. काकडे कॉलेजची खरी चोरी पुरूषोत्तम जगताप त्यावेळी कारखान्याचे संचालक असताना त्यांनी व मु.सा काकडे कॉलेजचे तत्कालीन OS बाळासाहेब भाऊसाहेब जगताप या दोघांनीच संगणमताने मु.सा. काकडे कॉलेजची चोरी केली आहे. जर माझे म्हणणे खोटे वाटत असेल तर माझी सोमेश्वरच्या सर्व सभासदांना विनंती आहे की कारखान्याचे चेअरमन यांचेवर दबाव टाकुण सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, मु.सा.काकडे कॉलेज व कारखान्याच्या कारभारा बाबत विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात यावी की जेणे करून दोन्ही कॉलेजचे सर्व वास्तव सभासदांपुढे यावे हा सभासदांचा अधिकार आहे. त्यावेळेस मी कॉलेजची खरी चोरी कोणी केली याचे पुरावेही सभासदांपुढे मांडील मग सभासदांनीच ठरवावे खरा चोर कोण? तसेच कारखान्या गैरकारभारा विषयी व दोन्ही कॉलेज संबंधी कृती समितीच्या वतीने टप्याटप्याने वर्तमानपत्र व इलेक्ट्रिक मिडीया व्दारे भुमिका मांडणार आहे.

पुरुषोत्तम जगताप यांनी मा. अजितदादा पवार यांची वेळ घ्यावी तसेच सर्व सभासदांना निमंत्रण देवुन दोन्ही कॉलेज व कारखान्याच्या कारभारा विषयी विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात यावी. त्यावेळी भी सर्व सभासद व अजितदादांच्या पुढे मु.सा. काकडे कॉलेज चोरणारा खरा चोर, जर पुरुषोत्तम जगताप हेच आहेत ! हे पुराव्यानिशी सिद्ध करेल व तसे सिद्ध न केल्यास सर्व सभासदांची मी जाहिर माफी मागेल, पण खरा चोर पुरूषोत्तम जगताप हाच आहे हे पुराव्यानिशी सिद्ध केल्यास त्याने सभासदांची व अजितदादांची लोटांगण घेवुन जाहिर माफी मागावी व तात्काळ राजीनामा द्यावा. तसेच मी पुरुषोत्तम जगताप यांच्यावर मु.सा. काकडे कॉलेज चोरी केल्या बाबत खोटे आरोप केल्याप्रकरणी लवकरच. | अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. त्याचप्रमाणे पुरुषोत्तम जगताप याचेवर न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी मी हायकोर्ट मुंबई येथे अवमान याचिका दाखल करणार आहे.

Releated Posts

राज्यात निवडणुकीचा धडाका! १२ जिल्हा परिषदा अन् १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला रणसंग्राम

प्रतिनिधी  राज्यातील मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने आज १२ जिल्हा…

ByBymnewsmarathi Jan 13, 2026

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संभाजी होळकर यांची नियुक्ती

प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संभाजी होळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्यावर ही…

ByBymnewsmarathi Jan 7, 2026

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा – प्रकृती कारणास्तव पदत्याग

प्रतिनिधी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृती कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी २१ जुलै २०२५ रोजी…

ByBymnewsmarathi Jul 21, 2025

निंबुत ग्रामपंचायत साठी सर्वसाधारण पुरुष आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर अनेक जणांनी सरपंच पदासाठी बांधले गुडघ्याला बाशिंग.

 संपादक मधुकर बनसोडे.  नींबूत ग्रामपंचायत साठी पहिल्यांदाच निवडला जाणार जनतेतून सरपंच  नींबूत ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत ही…

ByBymnewsmarathi Apr 28, 2025