सामाजिक कार्यकर्ते दादु मांगडे व माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश राव यादव यांच्या पाठपुरावा ने वाघळवाडी सोमेश्वर नगर ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांची चौकशी आदेश?

माझा जिल्हा

प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील बहुचर्चित असलेली वाघळवाडी सोमेश्वरनगर ग्रामपंचायत चा सन २०१८ ते सन २०२२ मधील झालेल्या दप्तराची चौकशी व निष्कृष्ठ दर्जाचा कामांची चौकशी करुन तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषद चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद सचिन घाडगे साहेब यांनी दिले आहेत तर ग्रामपंचायतीच्या दप्तराची तपासणी करुन अहवाल सात दिवसांत सादर करण्याचे आदेश बारामती गटविकास अधिकारी यांनी दिले आहेत.. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे व वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी न करणारे ग्रामसेवक श्री नरसिंग दौलत राठोड यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठीसामाजिक कार्यकर्ते दादु मांगडे यांनी पुणे जिल्हा परिषद ला केलेल्या मागणीला यश आले? असुन उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बारामती पंचायत समिती कार्यालय यांना याबाबत चौकशी करुन कार्यवाहीचा अहवाल देण्याची सुचना केले आहे?.. माहिती अधिकार कार्यकर्ते दादु मांगडे पाटील व सुरेश यादव यांनी वाघळवाडी सोमेश्वरनगर ग्रामपंचायतच्या दप्तर तपासणी होत नाही तोपर्यंत

पूर्व परवानगी शिवाय धनादेश काढु नयेत याबाबत अर्ज केला होता याबाबत बारामती पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी विस्तार अधिकारी आर व्हि चांदगुडे यांना याबाबत चौकशी करून सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे सांगितले आहे