डिजिटल मीडिया एक संघाची सोमेश्वर नगर येथे बैठक( चर्चासत्र) संपन्न.

सामाजिक

प्रतिनिधी

 बारामती -: डिजिटल मीडिया एक संघ यांच्यावतीने सोमेश्वर मंदिर या ठिकाणी चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आलेले होते. या चर्चासत्रांमध्ये प्रामुख्याने डिजिटल मीडिया पत्रकार यांना डिजिटल पत्रकारिता करत असता येणाऱ्या अडचणी वरती नेमक्या काय त्या कशा सोडवाव्या व कायद्याच्या चाकोरीत राहून कशी पत्रकारिता करावी व एक संघ राहिल्याने होणारे जे चांगले फायदे.

तसेच अनेक विषयावरती चर्चा करून त्यामध्ये कशा पद्धतीने मार्ग काढले जातील यावर चर्चा पार पडली.तसेच डिजिटल मीडिया च्या पत्रकारांना जाहिराती एक संघ होऊन कशा घ्याव्या तसेच वेबसाईट कशा पद्धतीने आर्टिकल लिहून ते वाचकांना कसे आवडेल ही देखील चर्चा झाली तसेच डिजिटल मीडिया च्या पत्रकारांना वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन शिबीर राबवले पाहिजे तसेच यावेळी डिजिटल मीडिया एक संघ भविष्यात डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी अशा पद्धतीने काम करणार आहे यावर देखील वरिष्ठांकडून मार्गदर्शन करण्यात आले.

 डिजिटल मीडियाच्या पत्रकार बांधवांनी येणाऱ्या काळामध्ये एक संघ राहणं गरजेचं आहे यावरती बारामती लाईव्ह चे मुख्य संपादक अमित बगाडे यांनी अतिशय सुंदर पद्धतीने माहिती दिली.या कार्यक्रमासाठी डिजिटल मीडिया एक संघाचे संस्थापक अध्यक्ष संपादक मधुकर बनसोडे, संपादक विनोद गोलांडे,सहसंपादक रमीज जादगार, संपादक अमित बगाडे, संपादक निखिल नाटकर, प्रतिनिधी सोपान कुचेकर, प्रतिनिधी फिरोज भालदार,आधी डिजिटल मीडिया पत्रकार बांधव उपस्थित होते.