• Home
  • माझा जिल्हा
  • सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापर मर्यादा १५ दिवस शिथीलतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
Image

सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापर मर्यादा १५ दिवस शिथीलतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

प्रतिनिधी

 जिल्ह्यात २०२३ मधील सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी १५ दिवसासाठी मर्यादा शिथील करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेश जारी केले आहेत.

केंद्र शासनाने ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, २०१७ अनुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबतचे नियम निश्चित केलेले आहेत. श्रोतेगृहे, सभागृह, सामुहिक सभागृहे, मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागाखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार १५ दिवस निश्चित करुन सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत सूट जाहीर करण्यासाठी राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत केले आहे.

त्यानुसार पुणे जिल्ह्यासाठी सवलतीचे १५ दिवस निश्चित करण्यात आले आहेत. १९ फेब्रुवारी शिवजयंती, १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, १ मे महाराष्ट्र दिन, २३, २४, २६ व २७ सप्टेंबर गणपती उत्सव, २८ सप्टेंबर ईद ए मिलाद व अनंत चतुर्दशी, २३ व २४ ऑक्टोबर नवरात्री उत्सव, १२ नोव्हेंबर दिपावली, २५ डिसेंबर ख्रिसमस (नाताळ सण), ३१ डिसेंबर वर्षअखेर तसेच महत्वाच्या कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार उर्वरित २ दिवस परवानगी देण्यात येईल. ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करावा, क्षेत्राप्रमाणे ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज ठेऊ नये तसेच शांतता क्षेत्रात ही सूट लागू नसल्याचे, आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026