• Home
  • माझा जिल्हा
  • शिष्यवृत्ती परीक्षेची तात्पुरती उत्तरसूची संकेतस्थळावर प्रसिद्ध -आक्षेप नोंदवण्यासाठी २३ फेब्रुवारीपर्यंत मुदत
Image

शिष्यवृत्ती परीक्षेची तात्पुरती उत्तरसूची संकेतस्थळावर प्रसिद्ध -आक्षेप नोंदवण्यासाठी २३ फेब्रुवारीपर्यंत मुदत

प्रतिनिधी

पुणे दि.१७: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १२ फेब्रुवारी २०२३ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ.५ वी) आणि पूर्व माध्यमिक (इ.८ वी) परीक्षेची इयत्तानिहाय व पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे, असे परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी कळविले आहे.

ही उत्तरसूची www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप परिषदेच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईनरित्या २३ फेब्रुवारी २०२३ पर्यंत नोंदवता येतील. ऑनलाईन निवदेन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये नोंदवता येईल. मुदतीनंतर त्रुटी, आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही. ऑनलाईन निवेदनाशिवाय टपाल, समक्ष अथवा ईमेल आदी कोणत्याही प्रकारे नोंदवलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

*ऑनलाईन निवेदनपत्रातील माहितीत दुरुस्ती करण्याची कार्यपद्धती*

विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन निवेदनपत्रातील माहिती व शाळा माहिती प्रपत्रात विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, लिंग आदी दुरुस्ती करण्यासाठी २३ फेब्रुवारी २०२३ पर्यंत शाळांच्या लॉगीनमध्ये अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. अन्य कोणत्याही पद्धतीने तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असेही उपायुक्त श्री. राठोड यांनी कळविले आहे.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026