- . वडगाव निं. प्रतिनिधी- फिरोज भालदार शुक्रवार दि. १७ /२/२०२३ रोजी बालाजी लॉन्स ,विजयनगर, काळेवाडी पिंपरी , पुणे या ठिकाणी संसदरत्न खासदार मावळ लोकसभा श्रीरंग आप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने व महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या सहकार्याने

- महाराष्ट्र श्री २०२३ राज्यस्तरीय भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून २०० हून अधिक स्पर्धक उपस्थित होते. या भव्य अशा स्पर्धेत महाराष्ट्र श्री २०२३ चा किताब बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावचे सुपुत्र सौरभ सुधीर हिरवे यांनी मिळवला. सौरभ हिरवे यांना त्यांचे कोच म्हणून त्यांना त्यांचे गुरुवर्य संजय चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेते अनुप सिंग ठाकूर व सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हे उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजक सुनील पाथरमल यांनी केले होते . या स्पर्धेत महाराष्ट्र श्री २०२३ चे मानकरी सौरभ हिरवे या विजेत्याला रोख रक्कम १,०००००/- एक लाख रुपये व ट्रॉफी असे बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

















