शिक्षण विभागातील लाचखोर महिला अधिकारी व कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात. सापडल्याने एकच खळबळ.

माझा जिल्हा

विशेष प्रतिनिधी शिवाजीराव काकडे.

१) प्रमिला प्रभाकरराव गिरी, वय ३८ वर्ष, वरिष्ठ लेखाधिकारी, वर्ग २. शिक्षण विभाग, पुणे.

२) अनिल श्रीधर लोढे, वय ५७ वर्ष, कनिष्ठ लेखाधिकारी, शिक्षण विभाग, पुणे असे ताब्यात घेतलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

यातील तक्रारदार हे शिक्षक असून, त्यांचे सेवापुस्तकावर सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीची पडताळणी करुन देण्यासाठी लोकसेवक प्रमिला गिरी यांची लाच मागणी असल्याबाबतची तक्रार ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती. सदर तक्रारीची पडताळणी केली असता, लोकसेवक क्रमांक १ प्रमिला गिरी यांनी तक्रारदार यांचेकडे सहा हजार रुपयांची लाच मागणी केली. लोकसेवक क्र. २ अनिल लोंढे यानी त्या लाच मागणीस सहाय्य करून क्र. १ यांचेवतीने पाच हजार रुपये लाच रक्कम स्वीकारल्यावर दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, लष्कर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरु आहे.

ला.प्र.वि. पुणे येथील पोलीस उप अधीक्षक विजयमाला पवार तपास करत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

शासकीय अधिकारी, कर्मचारी लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केले आहे.