प्रतिनिधी.
पुणे जिल्हा मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय बारामती येथे चालु झाले अनेक जनसामान्यांना कायद्या विषयक मोफत सल्ला देण्यासाठी मानव अधिकार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महामहिम डॉ एम एल एस प्रसाद यांचे मार्गदर्शनाखाली मानव अधिकार फाउंडेशन , भारत अंतर्गत महाराष्ट्रप्रदेश कार्यकारीणी कडून राष्ट्रीय महासचिव तथा प्रदेश अध्यक्ष प्रमोद फुलसुंदर तसेच बारामती डिस्ट्रिक्ट कोर्ट चे दिवाणी न्यायाधीश पश्चीम विभाग श्री एन आर वानखेडे साहेब, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी(आर टी ओ) राजेंद्र केसकर साहेब सामाजिक व न्याय संरक्षण उपाध्यक्ष शिंदे साहेब व इतर अनेक शासकीय अधिकारी उपस्थित होते.
बारामती मानव अधिकार पदाधिकरी अतिशय सक्षम असून एक चांगले संघटन या ठिकाणी पहायला मिळाले. प्रत्येक नागरिकाला मानव अधिकार काय हे या कार्यक्रमातून समजले असावे व अधिकाऱ्यांना देखिल वेगळे काही या पुढे सांगावे लागेल असे वाटत नाही योग्य वाटचाल करताना संघटनेत प्रत्येकाची साथ हवी आपण सर्व सोबत आहोत व मानव अधिकार फाउंडेशन भारत कायम आपल्या सोबत आहे . तसेच लोकशाही24 या न्यूज पोर्टलचा देखील वर्धापन दिन यावेळी संपन्न झाला या कार्यक्रमाचे औचित्य साधून सामाजिक,शैक्षणिक,राजकीय, पत्रकारिता,शेती या विभागातील अनेक मान्यवरांचे सन्मान ज्यावेळी करण्यात आले.या कार्यक्रमाची प्रस्तावना धनराज जगताप यांनी केली